esakal | 'उदयनराजेंची भाषा याेग्य नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

'उदयनराजेंची भाषा याेग्य नाही'

नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. या प्रश्नावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कुणी… कुणी.. मागणी केली आहे ? अशी उलट विचारणा पत्रकारांना करुन ते म्हणाले, नारायण राणे यांचे नाव महाराष्ट्र विसरला आहे. त्यामुळे त्यांच्याच पक्षात त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे आता आम्ही त्यांच्यावर बोलुन त्यांना अधिक महत्व देणे मला काय योग्य वाटत नाही, असे सांगुन त्यांना बेदखल केले.

'उदयनराजेंची भाषा याेग्य नाही'

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) महाराष्ट्र सरकारची योग्य दिशेने काम सुरु आहे. मात्र रक्तपाताची भाषा करुन, उद्रेक करुन, हिंसाचार करुन त्याला वेगळे वळण लावण्याची गरज नाही, असे मत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या वक्तव्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी येथे पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.

शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बाेलताना मंत्री देसाई म्हणाले, मराठा आरक्षणाची राज्य शासनाची भुमिका भुमिका स्पष्ट आहे. मंत्री मंडळातील अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जावुन जेष्ठ विधीतज्ञ, सीनीअर कौन्सील यांच्याशी चर्चा करुन मराठा आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे, अशी चर्चा नियमीत सुनावनी कोर्टात सुरु होण्यापुर्वी झाली आहे.

ज्या राज्यांनी ५० टक्यापेक्षा जास्त आरक्षण दिले आहे, त्यांचीही सुनावणी सर्वोच्य न्यायालय एेकुन घेणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची भुमिका भक्कम होणार आहे. त्यामुळे रक्तपाताची भाषा करुन, उद्रेक करुन, हिंसाचार करुन त्याला वेगळे वळण लावण्याची गरज नाही, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्यावर मंत्री देसाई यांनी व्यक्त केले.

मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही, तर रक्तपात होईल; उदयनराजेंचा सरकारला कडक इशारा

''आईच्या पाठोपाठ माझ्या जीवनाला आकार आणि आशय देणारी माझी प्रिय पत्‍नी...'' 

ज्यांचा महाराष्ट्रातल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही, पोलिसांवर विश्वास नाही. माझ्यावरील खटले हिमाचल प्रदेशमध्ये चालवा असे म्हणणाऱ्या कंगणा राणावतला महाराष्ट्र पोलिसांवर व सरकारवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले.

कंगणा राणावतने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर या प्रकरणातील सत्य बाहेर आल्यास ठाकरे सरकार पडेल असे ट्विट केले आहे. त्यावर गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, कंगणा राणावतच्या ट्विटला किती महत्व द्यायचे हा संगळ्यानीच विचार करण्यासारखा विषय आहे. ज्यांच्या महाराष्ट्राच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही, महाराष्ट्रात राहयचं, करिअर करायचं, काम करायचं, महाराष्ट्रातील लोकांच्या जीवावर मोठ व्हायचं आणि इथल्या पोलिसांवर, न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा नाही. माझ्यावरील खटले हिमाचल प्रदेशमध्ये चालवा असे म्हणणाऱ्या कंगणा राणावतला महाराष्ट्र पोलिसांवर व सरकारवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.

महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉलंड यार्ड पोलिसांशी होते. महाराष्ट्र पोलिसांचा नावलैकीक जगाला माहिती आहे. सचिन वाझे यांच्या केसमध्ये महाराष्ट्र पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असताना त्यांच्यावर गैरविश्वास दाखवुन त्यात केंद्राने हस्तक्षेप करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया देखील मंत्री देसाईंनी दिली.

मंत्री देसाई म्हणाले, विधानसभेत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व सदस्यांनी आग्रही मागणी केली, तेव्हा या तपास कामांमधून वझे यांना बाजूला करून त्यांची इतरत्र बदली करण्यात आली. या प्रकरणात मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिस योग्य दिशेने तपास करत असताना केंद्राने त्यात हस्तक्षेप करणे योग्य नाही. महाविकास आघाडी सरकार दोषी असणाऱ्या कुणालाही पाठिशी घालणार नाही. महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉलंड यार्ड पोलिसांशी होते. महाराष्ट्र पोलिसांचा नावलैकीक जगाला माहिती आहे. सचिन वाझे यांच्या केसमध्ये महाराष्ट्र पोलीसांचा तपास योग्य दिशेने सुरु असताना त्यांच्यावर गैरविश्वास दाखवुन त्यात केंद्राने हस्तक्षेप करणे योग्य नाही.

Viral Video : जिल्हा न्यायाधीशांस टाेल मॅनेजरने शिकविला नियमांचा धडा; पैसे दिल्यानंतरच साेडले वाहन 

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top