
रात्री कोणीतरी हा फलक फाडल्याची चर्चा सुरू झाल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले हाेते. त्यावेळी माध्यमांच्या विविध प्रश्नांना मंत्री देसाई यांनी उत्तर दिले.
सातारा : पोवई नाक्यावर तयार केलेल्या ग्रेड सेपरेटरचे शुक्रवारी खासदार उदयनराजे भाेसले यांनी उदघाटन केले. त्यावेळी घटनास्थळी माेठ्या प्रमाणात गर्दी हाेती. याबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना माध्यमांनी छेडले असता त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी ग्रेडसेपरेटरचे केलेले उद्घाटन सोशल मीडिया पाहिल्यानंतरच समजले असे सांगितले. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री देसाई यांनी या कार्यक्रमाला विना परवानगी गर्दी आणि नियमांचे पालन झाले नसल्यास त्याचीही चौकशी करण्याचे स्पष्ट संकेत दिले.
येथील पोवई नाक्यावर तयार केलेल्या ग्रेड सेपरेटरचे शुक्रवारी (ता.८) खासदार उदयनराजे भोसले यांनी शेकडो कार्यकर्ते, नागरिकांच्या उपस्थितीत लोकार्पण केले. यानंतर त्यांनी ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला झाल्याची घोषणा तेथेच केली. या वेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे, "साविआ'चे पक्षप्रतोद निशांत पाटील, नगरसेवक ऍड. दत्ता बनकर, "साविआ'चे नगरसेवक, पदाधिकारी, युवक उपस्थित होते. फित कापून ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर खासदार उदयनराजेंनी त्याची पाहणी देखील केली हाेती.
बॉम्बेचे मुंबई झाले ना! औरंगाबादच्या नामांतरावर उदयनराजेंची स्पष्ट भूमिका
शनिवारी (ता.९) या ग्रेड सेपेरटरच्या एका भुयारी मार्गावर लावण्यात आलेला श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव असणारा फलक फाटल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर साताऱ्यात काही काळ तणाव निर्माण झाला हाेता. रात्री कोणीतरी हा फलक फाडल्याची चर्चा सुरू झाल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले हाेते. त्यावेळी माध्यमांच्या विविध प्रश्नांना मंत्री देसाई यांनी उत्तर दिले. त्यापैकी उदयनराजे भोसले यांनी ग्रेडसेपरेटरचे केलेले उद्घाटन सोशल मीडिया पाहिल्यानंतरच समजले, "या कार्यक्रमाला विना परवानगी गर्दी आणि नियमांचे पालन झाले नसल्यास त्याचीही चौकशी करु असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.
पर्यटकांनाे! महाबळेश्वर, पाचगणीला फिरायला निघालात? मग हे वाचाच
साताऱ्याच्या बहादराची उद्योगात मुकेश अंबानींशी स्पर्धा; ‘दुकान’अॅप पुढे जिओ मार्ट हतबल
संपादन : सिद्धार्थ लाटकर