
कऱ्हाड : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यावर अन्याय केला, असे माझे म्हणणे नाही; परंतु भाऊसाहेब म्हणजे अभयसिंहराजे भोसले यांच्यावर मात्र निश्चित अन्याय केला. त्यांचे नेतृत्व मोठे होते. त्या वेळी काँग्रेसमध्ये त्यांचे चांगले स्थान होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले नसले, तर कदाचित काँग्रेसने त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले असते. जसे त्यांचे नुकसान झाले, तसेच जिल्ह्याचेही नुकसान झाल्याची भावना आज सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.