

Prof. Kavita Mhetre declared as NCP’s mayoral candidate in Mhaswad under Sharad Pawar’s leadership.
Sakal
म्हसवड : पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व २० जागा लढविण्यात येणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी पक्षाच्या महिला प्रवक्त्या प्रा. कविता म्हेत्रे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभयसिंह जगताप यांनी केली. लवकरच इतर उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.