
Devotees sowing saptadhanya and offering the first garland to Goddess Ambabai during Ghatasthapana at Kolhapur.
Sakal
सातारा : भक्ती- शक्तीचे प्रतीक असणाऱ्या आदिशक्तीच्या नवरात्राला जिल्ह्यात, तसेच घराघरांत मोठ्या भक्तिभावाने सोमवारी सुरुवात झाली. पुरातन आणि शिवकालीन मंदिरांसह इतर ठिकाणी प्रथेप्रमाणे घटस्थापना झाल्यानंतर होणाऱ्या आराधनेमुळे जिल्हा आदिशक्तीमय होण्यास सुरुवात झाली आहे. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक मंडळांच्या दुर्गामूर्ती ढोलताशांच्या गजरात प्रतिष्ठापनेसाठी मंडपात नेण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती.