जेवढा त्रास पवारसाहेबांना द्याल, दुप्पट जनता तुम्हांला देईल; शशिकांत शिंदेंचा भाजपला इशारा

उमेश बांबरे
Friday, 4 December 2020

आतापर्यंत भाजपचा विजय हा शिवसेनेमुळेच होत होता, हे दिसून येत होते. पण भविष्यात तिन्ही पक्ष एकत्र आल्यास भाजपला जनता जागा दाखवेल,'' असेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

सातारा : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निकालाने भाजपला चपराक बसली आहे. महाराष्ट्रातील पदवीधर व शिक्षक मतदार शरद पवारांच्या विचारांच्या व महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहिली आहे. महाराष्ट्राच्या या नेत्याला तुम्ही जेवढे लक्ष करण्याचा प्रयत्न कराल, तेवढी तुमची उलटी गणती सुरू होईल, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी येथे दिला आहे.
 
पुणे पदवीधर मतदारसंघातून अरूण लाड यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ''धुळे - नंदूरबारचा निकाल आल्यावर प्रवीण दरेकरांपासून भाजपच्या सर्व नेत्यांनी आता महाविकास आघाडीची उलटी गणती सुरू असे म्हणायला सुरवात केली होती. आता मात्र त्यांना जबरदस्त चपराक बसली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघावर आपलाच हक्क आहे, असे गृहीत धरुन चालणाऱ्यांना मतदारांनी योग्य निर्णय दिला आहे,''

''अरूण लाड यांच्या विजयाबद्दल मी सातारा जिल्ह्यातील पदवीधर मतदारांचे आभार मानतो. काही दिवसांपासून ज्या प्रकारच्या बातम्या पसरविल्या जात होत्या. त्याकडे लक्ष न देता शरद पवारांच्या विचारांच्या व महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता उभी राहिली आहे. महाराष्ट्रातील या नेत्याला तुम्ही जेवढे लक्ष करण्याचा प्रयत्न कराल तेवढी तुमची उलटी गणती सुरू होईल,'' असा टाेलाही आमदार शिंदे यांनी लगावला आहे.

राजकीय फायदयासाठी समाजाचा बळी देत आहात; मराठा क्रांती मोर्चाचे शशिकांत शिंदेंना खडेबाेल 

''भाजपचे नेते महाविकास आघाडीपुढे जेवढ्या अडचणी निर्माण करतील तेवढी जनतेची साथ महाविकास आघाडीला मिळत जाईल, हे या निकालातून सर्व सामान्य जनतेने दाखवून दिले आहे. सातारा जिल्ह्यातील जनता नेहमीच शरद पवारांच्या विचारांच्या पाठीमागे कायम उभी राहतील. आतापर्यंत भाजपचा विजय हा शिवसेनेमुळेच होत होता, हे दिसून येत होते. पण भविष्यात तिन्ही पक्ष एकत्र आल्यास भाजपला जनता जागा दाखवेल,'' असेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

#NavyDay2020 भारत-पाक युद्धात सातारकरांनी समुद्रावर घडविला इतिहास; नौदलात बजावली चोख भूमिका

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shashikant Shinde Criticised BJP On Criticising Sharad Pawar Satara News