शशिकांत शिंदेंचा आमदारांना चिमटा; आमच्या पोस्टरवर आमच्या पक्षाचे चिन्ह असतं!

शशिकांत शिंदेंचा आमदारांना चिमटा; आमच्या पोस्टरवर आमच्या पक्षाचे चिन्ह असतं!

कोरेगाव (जि. सातारा) : माझे कार्यक्षेत्र विस्तारल्याने जिल्हा परिषद, पालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष वाढवण्यासाठी मी सातारा-जावळीसह संपूर्ण जिल्हा व राज्यात कोठेही फिरणार, मग समोर कोणीही असो, अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधकांना पुन्हा ठणकावले. मला व्याजासकट हिशेब द्यायचा आहे, हा हिशेब कोरेगावातच देणार, त्यासाठी मी तुमच्यामध्येच आहे आणि शेवटपर्यंत तुमच्यामध्येच राहीन. त्यामुळे कोरेगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी पुन्हा नव्या जोमाने, ताकदीने उभे राहून काम करावे, असे आवाहन आमदार शिंदे यांनी कोरेगावकरांना केले.
 
एकंबे (ता. कोरेगाव) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्‌घाटन नुकतेच आमदार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सभापती राजाभाऊ जगदाळे, शिवाजीराव महाडिक, तानाजीराव मदने, भगवानराव जाधव, अरुण माने, भास्कर कदम, श्रीमंत नि. झांजुर्णे, सुप्रिया सावंत, शहाजीराव बर्गे, रमेश उबाळे, संजय पिसाळ, श्रीमंत स. झांजुर्णे, डॉ. गणेश होळ, प्रताप कुमुकले, अजित बर्गे, ऍड. पांडुरंग भोसले, गोरख चव्हाण, पी. के. चव्हाण, विजयराव चव्हाण, सरपंच शोभा कर्णे, उपसरपंच अशोक चव्हाण उपस्थित होते.

आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी (Shivendra Raje Bhosale) केलेल्या टिकेला नाव न घेता शिंदेंनी उत्तर दिले. काही मंडळी विधिमंडळात येऊ नयेत, याचे नियोजनच भाजपच्या लोकांनी केले होते. कोरेगाव मतदारसंघात झालेल्या पैशांच्या पावसाने माझा पराभव केला. माझा पराभव जनतेतून नव्हे, तर राज्य पातळीपासून अनेकांनी केला. तरीही राष्ट्रवादीचा (Nationalist Congress Party) निष्ठावंत म्हणून मी विधान परिषदेवर गेलोच. आपण केलेला बदल चुकलेला आहे, हे या मतदारसंघातील लोकांना लवकरच पटेल, असे नमूद करून आमदार शिंदे म्हणाले, ""विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर 50-60 हजारांचा फरक पडला असता. मी लोकांमधला असल्याने काठावर नापास झालो. मात्र, निवडणुकीनंतर मी लगेचच कार्यरत झालो. विद्यमान आमदारांच्या निवडणुकीनंतर किती सभा झाल्या, ते माहीत नाही.

सत्ता मिळाल्यावर माणसाने जमिनीवर राहावे, डोक्‍यात हवा गेली की माणूस संपतो.'' आधे इधर, आधे उधर', कामाच्या वेळेला शिवसेना, बाकीच्या वेळेला भाजप, अशी परिस्थिती आहे. आम्ही कधी अशी दुहेरी भूमिका घेतली नाही. आमच्या पोस्टरवर आमच्या पक्षाचे चिन्ह असते. त्यांच्या पोस्टरवर त्यांच्या पक्षाचे चिन्ह असते का, हे स्पष्ट झाले पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.

सभापती जगदाळे, शिवाजीराव महाडिक, व्ही. टी. चव्हाण, सतीश कर्णे यांची भाषणे झाली. विद्यमान आमदार लोकनियुक्त आहेत की नोटनियुक्त? असा प्रश्न उपस्थित करून रमेश उबाळे म्हणाले, ""ते फक्त गाजर दाखवून आश्वासने देऊ शकतात. विकासकामे केवळ शशिकांत शिंदे हेच करू शकतात, याचा अनुभव सध्या मी घेत आहे आणि त्यामुळेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचा मला अभिमान आहे."

शरद पवारांशी चर्चेनंतरच व्यवस्थापनाने आम्हांस प्रतापगड साेपविलाचा संचालक मंडळास पडला विसर!

आता जे काही घडेल, ते सातारा - सांगलीतील अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतरच!

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com