Jawali APMC: शरद पवारांच्या विश्वासू नेत्याची भाजपसोबत हात मिळवणी; साताऱ्यात हालचालींना वेग

ncp
ncpesakal

राज्यात बाजार समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. अनेक ठिकानी मविआमध्ये फूट पडल्याचे पाहिला मिळत आहे. तर राष्ट्रवादीने भाजपसोबत युती केल्याचे देखील पाहिला मिळत आहे. अशातच सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये मतभेद पाहिला मिळत आहेत.

ncp
Ajit Pawar: 'जे वाजपेयी-अडवाणींना जमलं नाही ते...' अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

साताऱ्यातील जावळी बाजार समितीत महाविकास आघाडीत फूट पडली असून राष्ट्रवादीने-भाजप सोबत युती केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील यांनी एकत्र येत भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासोबत पॅनेल उभे केले आहे.

यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पाहिला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी शुक्रवारी खासदार शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेवून.

ncp
Mumbai: सेक्स रॅकेट प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

याबाबतची तक्रार त्याच्याकडे केली आहे. त्यावर शरद पवार यांनी पुढील महिन्यात दौऱ्यावर आल्यावर मी याबाबत स्पष्ट बोलेन असे सांगितले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेते अजित पवार हे जावळीच्या दौऱ्यावर होते.

या दौऱ्यात भाजपच्या नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यातून वाटलं होतं जावळीत चमत्कार घडेल मात्र अजित पवारांची पाठ फिरताच दोन आमदारांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने दीपक पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

जावळी-महाबळेश्वर बाजार समितीत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील यांनी एकत्र येत पॅनेल उभे केले आहे. तर विरोधात राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार, माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी दुसरे पॅनेल उभे केले आहे. येथे राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपशी हात मिळवणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com