

Major Ruckus in Legislative Council; Shinde Targets Govt Over Police Issues
sakal
सातारारोड : कोरेगाव पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीवरून विधान परिषदेत वातावरण चांगलेच तापले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधीद्वारे मुद्दा उपस्थित करत पोलिस प्रशासन आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार नागराज कदम आणि अक्षय शिंदे यांच्या कामकाजावर गंभीर आरोप करत त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले. या विषयावर सभागृहात तब्बल १८ मिनिटे जोरदार खडाजंगी झाली.