पोलीस महासंचालकाची गळा चिरून हत्या; दहशतवादी कनेक्शन आलं समोर, PAFF नं स्वीकारली जबाबदारी

पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.
DG Hemant Lohia Murder Case
DG Hemant Lohia Murder Caseesakal
Summary

पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.

DG Hemant Lohia Murder Case : जम्मू-काश्मिरचे पोलिस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया (Jammu and Kashmir DG Hemant Lohia) यांच्या प्रकरणात आता दहशतवादी कनेक्शन (Terrorist Connection) समोर आलंय. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (People's Anti-Fascist Front PAFF) नावाच्या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

DG Hemant Lohia Murder Case
North Korea : किम जोंग उनच्या देशानं टोकियोवर डागलं क्षेपणास्त्र; जपान नागरिकांत घबराट

रात्री उशिरा 11.45 च्या सुमारास हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेत त्यांचा नोकर यासिर अहमद (Yasir Ahmed) याचं नाव समोर आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो खून केल्यानंतर पळताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिर हा गेल्या 6 महिन्यांपासून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या घरी काम करत होता.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहे. काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर या संघटनेचं नाव समोर आलं. याआधीही या संघटनेनं अनेकदा व्हिडिओ जारी करून धमक्या दिल्या आहेत. ऑक्टोबर 2021 मध्ये पुंछ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही या संघटनेचं नाव समोर आलं होतं. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले.

DG Hemant Lohia Murder Case
TRS : मोदींना टक्कर देण्यासाठी KCR यांची लवकरच राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री

हेमंत लोहिया यांच्या घरी काही काम चालू होतं, त्यामुळं ते जम्मूमध्ये त्यांचा मित्र राजीव खजुरिया यांच्या कुटुंबासोबत राहत होते. इथंच त्यांची हत्या करण्यात आली. अहवालानुसार, 1992 बॅचचे आयपीएस अधिकारी हेमंत लोहिया यांची दोन महिन्यांपूर्वी या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. ते मूळचे आसामचे आहेत. हत्येनंतर फरार झालेल्या नोकराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आधीच अनेक पथकं तयार केली आहेत.

DG Hemant Lohia Murder Case
Gujarat : धार्मिक झेंड्यावरून हिंदू-मुस्लिम गटांत तुफान हाणामारी; 40 जणांना अटक

अमित शाह यांचा जम्मू-काश्मीर दौरा

आयपीएस अधिकारी हेमंत लोहिया यांना दोन महिन्यांपूर्वीच जम्मू काश्मीरच्या तुरूंग विभागाचे नवीन महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. ते शहराच्या बाहेर उदयवाला इथं राहत होते. हेमंत लोहिया यांच्या हत्येनं पोलिस प्रशासनाची झोप उडाली आहे. कारण, ही हत्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यापूर्वी झाली आहे. त्यामुळंच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अमित शाह तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com