

“MP Nitin Patil addressing workers in Patan; says development requires action, not speeches.”
Sakal
दहिवडी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, माण-खटावचे नेते शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीला चांगलाच दणका दिला आहे. आंधळी गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शेखर गोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांच्या गटात प्रवेश केला. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर शेखर गोरे गटाची ताकद वाढली आहे.