
Shekhar Gore’s strong message: “Time to work for people, not personal gain”
Sakal
बिजवडी : मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती व म्हसवड नगरपालिका निवडणुकीत निवडून आल्यानंतर अनेकांनी स्वतःच्या स्वार्थापोटी आमचा विश्वासघात केला. ज्या जनतेने निवडून आणले त्यांच्याशी प्रतारणा केली. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी करून दाखवावी, त्यांना शेखर गोरेंचा झटका काय असतो, ते दाखवून देणार आहे. या निवडणुकांत ताकदीनिशी उतरणार असून, प्रसंगी स्वबळावर लढणार आहोत. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी केले आहे.