नवरात्रोत्सवात गरबा, दांडियाला बंदी : जिल्हाधिकारी शेखर सिंह

नवरात्रोत्सवात गरबा, दांडियाला बंदी : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Updated on: 

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात शनिवार (ता.17) पासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. या नियमावलीत गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करून त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंगी आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली आहे.
 
जिल्हाधिकारी सिंह यांनी लागू केलेल्या नियमावलीत म्हटले, की सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी पालिका, स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता न्यायालयाने निर्गमित केलेले आदेशानुसार मर्यादित स्वरूपात मंडप उभारावेत. यंदाचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट त्या अनुषंगाने करावी. देवीच्या मूर्तींची उंची सार्वजनिक मंडळाकरिता चार फूट व घरगुती देवीच्या मूर्तींची उंची दोन फुटांच्या मर्यादित असावी. या वर्षी शक्‍यतो पारंपरिक देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्‍यतो घराच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्‍य नसल्यास कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा. नवरात्रोत्सवाकरिता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा.

नीरा नदीच्या पात्रातून सांगोला तालुक्यातील एकास वाचविण्यात यश

जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, असे पाहावे. आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी. तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेबाबतही जनजागृती करावी. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम टाळून आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंगी इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक आदींद्वारे उपलब्ध करून द्यावी.

तीन दिवसांपासुन मुंबई, हर्णै, गुजरातमधील नौका बंदरातच उभ्या 

देवीच्या मंडपात निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरीरिक अंतर तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष द्यावे. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे, संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढू नये. मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेय, पाण्याची व्यवस्था करण्यास मनाई असेल. मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

रावण दहनाला प्रेक्षक नकोत 

दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरूपाचा असावा. रावण दहनाकरिता आवश्‍यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाजमाध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nhalewadi Leopard Attack Two Year Old Dies in Satara Citizens Demand Action Against Forest Officials Over Safety Lapses in Area
Satara Murder Case Old Dispute Turns Deadly as 29 Year Old Man Dies After Iron Hoe Blow Two Suspects in Custody
Satara Leopard Attack Child Dies in Nhalewadi After Leopard Drags 26 Month Old Boy Away Villagers Demand Action
Sugar Mill Opening
Marathi News Esakal
www.esakal.com