वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन; रघुनाथ पाटलांचा सरकारला इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raghunath Patil

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने (Heavy Rain) हाहाकार माजविला होता.

वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन

सातारा : कोयना धरण (Koyna Dam) परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वृक्षतोड होत असल्याने पावसाळ्यात धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा रंग लाल व तांबडसर दिसत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून, झाडांची कत्तल करणाऱ्यांना सरकारचे अभय आहे. येत्या महिनाभरात या परिसरातील अनधिकृतपणे वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी (Shetkari Sanghatana President Raghunath Patil) आज पत्रकार परिषदेत दिला.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने (Heavy Rain) हाहाकार माजविला होता. या काळात कोयना धरणातून पाणी सोडल्यानंतर लालसर रंगाचे पाणी दिसून आले. हा प्रकार कोयना, चांदोली व राधानगरी या धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याने होत आहे. या परिसरातून ट्रक भरून झाडांची कत्तल सुरू असून, राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी चोरट्यांना अभय देत आहेत. हा प्रकार तत्काळ न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. अनधिकृतपणे झाडांच्या कत्तली करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वन विभागाला (Forest Department) निवेदन देण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: दिलासादायक! साताऱ्यातील प्रमुख धरणांत 75 टक्के पाणीसाठा

दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ते दिले जात असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसल्याचे सांगत सरकार फसवणूक करत आहे. भाजपने गेल्या पंचवार्षिकमध्ये व सध्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीचे पैसे द्यावे अन्यथा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष विकास जाधव, शिवाजी नांदखिले, राजेंद्र बर्गे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: कऱ्हाडात तब्बल 905 जणांकडे परवानाधारक बंदुका

सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा

सदाभाऊ खोत मंत्री झाले, गोपीचंद पडळकर आमदार आहेत. तुम्हाला कोणत्या पक्षाने ऑफर दिली आहे का, या प्रश्‍नावर रघुनाथ पाटील म्हणाले, ‘‘मी आजपर्यंत कुणालाही आमदारकी मागितली नाही. मात्र, मी ज्यांच्या छातीवर बिल्ले लावले. त्यांनी आमदार, खासदारकी भोगल्याचे सांगत राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला.’’

Web Title: Shetkari Sanghatana President Raghunath Patil Warns The Government About Tree Felling In Koyna Dam Area

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..