शिवजयंती मिरवणुकीला 'भाजप'चा रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न, शिवसेनाचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP ShivSena

शिवजयंती मिरवणुकीला 'भाजप'चा रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न, शिवसेनेचा आरोप

कऱ्हाड : कऱ्हाडला अक्षय तृतीयेला झालेल्या शिवजयंती निमित्त निघालेल्या दरबार मिरवणुकीत सर्व जाती धर्मासह सर्व पक्षाचे लोक सहभागी होते, कऱ्हाडकरांनीही ते पाहिले आहे मात्र तरिही विक्रम पावस्कर यानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना बोलावून त्यांना जनसमुदयासमोर बोलायला लावून ती शिवजयंती जणू भाजपची आहे असा अभास निर्माण करण्याच्या केलेला केविलवाणा प्रयत्न कऱ्हाडकरांच्या जिव्हारी लागला आहे, असा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज पत्राकर परिषेदत दिला. संयोजकांनी यातून बोध घ्यावा अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अशा इशाराही यावेळी देण्यात आला.

येथे शिवजयंती दरबार मिरवणूक झाली. त्यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख शशिराज करपे, शहर उपप्रमुख शेखर बर्गे, अक्षय गवळी, साजीद मुदजावर व पदाधिकारी उपस्थीत होते. पदाधिकाऱ्यांनी अनेक आरोप केले. त्यात हिंदू एकता आंदोलनतर्फे शिवजयंती साजरी झाली. मात्र ती त्यांनी साजरी केली की, भाजपने असा प्रश्न कऱ्हाडकरांना पडला आहे म्हणून शिवजयंतीवरुन काही मुद्दे समोर आले आहे जे लोकांच्या मनात आहे ते शिवसेनेतर्फे आम्ही मांडत आहोत.

जेष्ठ नगरसेवक विनायक पावस्कर यांच्याबद्दल आदर आहे आम्हीही शिवजयंतीत सामील होत होतो. त्यावेळी आम्ही लावलेला डॉल्बी श्री. पावसकर यांना खटकला होता तो आम्हाला अनेकदा काढायला भाग पाडले होते. आपल्याला असे शोभत नाही, वगैरे भाषा वापरत त्यांनी आम्हाला हक्काने सुनावले होते. तेही आम्ही सुध्दा हक्काने स्विकारले होते. पण त्यांचेच वारसदार विक्रम पावसकर डिजे लावून हाजारो तरुणांना त्यावर थिरकवयला लातात ते स्वतः सुद्धा थिरकतात ते श्री. पावसकर यांनी कसे स्विकारले याचे उत्तर त्यांनी देणे अपेक्षित आहे. शहरात सामाजिक सलोखा आहे. शिवजयंतीत प्रत्येकजण आपल्यापरिने योगदान देतात, अशा वेळी इतरांच्या भावना दुखावणाऱ्या घोषणा का दिल्या जातात त्याचे उत्तर विक्रम पावसकर यांनी द्यावे.

बरेच प्रश्न आहेत, मात्र संयोजकांनी एवढया प्रश्नांना उत्तरे दयावीत. लोक वर्गणीतून साजरी होणारी शिवजयंती श्री. पावसकर यांच्या नेतृत्वाखाली ५० वर्षापासून चांगल्या पध्दतीने साजरी होत आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांना घेवून शिवजयंती साजरी होत होती आणि कालच्या मिरवणुकीत शिवसेना तालुका प्रमुख नितीन काशिद, महिला जिल्हाध्यक्ष अनिताताई जाधव, शहर प्रमुख शशिराज करपे, उपशहर प्रमुख अक्षय गवळी, शेखर बर्गे, साजीद मुजावर, मयुर देशपांडे, अक्षय मोहिते, शंभूराज रैनाक, जोतीराम साळी आम्ही सर्व शिवसैनिक उपस्थित होते. पण या मिरवणुकीत भाजपच्या नेत्यांना निमंत्रण दिले गेले अन्य राजकीय पक्षातील लोकांना निमंत्रण का दिले नाही याचेही उत्तर अपेक्षीत आहे.

Web Title: Shiv Sena Alleges Apologetic Attempt Shiv Jayanti Procession As Bjp People Caste Religions Participate Occasion Shiva Jayanti Akshay Tritiya

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top