Shiv Sena and Raje Group leaders declare unity for the upcoming Phaltan Municipal elections.
Sakal
सातारा
Phaltan Politics:'फलटण पालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार'; राजे गट अन् शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचा एकदिलाने लढवण्याचा निर्धार..
Phaltan municipal election : दोन्ही गटांच्या एकतेमुळे शिवसेनेची फलटणमधील ताकद वाढली असून, कार्यकर्त्यांमध्येही मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. निवडणूक लढवतांना कोणताही अंतर्गत वाद न ठेवता एकदिलाने काम करण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.
फलटण : नगरपालिकेची निवडणूक राजे गट आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने लढवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे स्थानिक आघाडीसह धनुष्यबाण चिन्हावर ताकदीने लढवत असल्याने नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक निवडून येतील, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी केले.

