

Phaltan Politics Heats Up as Raje Camp Halts Nimbalkar’s Surge
Sakal
फलटण : भाजपवर अचूक निशाणा साधताना शिवसेनेच्या साथीने केलेले ‘राम’बाण औषध उपायकारक ठरल्याचे दिसून येते. ग्रामीण भागाचा केलेला विकास, राजकीय अनुभव आणि गावोगावी कार्यकर्त्यांची फळी ही राजे गटाच्या विजयाची त्रिसूत्री ठरली. त्या जोरावर रामराजे नाईक- निंबाळकर यांना मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांचा वारू रोखण्यात यश आले. या विजयाने राजे गटाने फलटणसह जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार कमबॅक केले आहे. ग्रामीण भागावर मजबूत पकड असल्याचे निकालातून अधोरेखित झाले.