
सातारा : विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज पोवई नाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी शिवसैनिकांनी मंत्री कोकाटे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या रास्ता रोकोमुळे पोवई नाक्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.