"उदयनराजेंकडे फक्त मनोरंजन म्हणून पाहा"

पुष्पा चित्रपटाच्या प्रेमात उदयनराजेंनी लुंगी घालून फोटोशूट केलं होतं.
Udayan Raje Bhosale
Udayan Raje BhosaleTeam eSakal

उदयनराजेंचं (Udayanraje Bhosale) पुष्पा प्रेम शिवेंद्रराजेंना (Shivendraraje Bhosale) खटकलं असल्याचं समजतंय. पुष्पा चित्रपटाच्या (Pushpa Movie) प्रेमात पडलेल्या उदयनराजेंनी लुंगी घालून फोटोशूट केलं होतं. ते फोटोशूट सध्या चांगलंच चर्चेचा विषय ठरला होता. उदयन राजेंच्या या फोटोशूटवर शिवेंद्रराजेंनी मात्र खरमरीत टीका केली आहे. नगरपालिकेची निवडणूक आली की, लुंगी लावणे, गाडीत गाणे लावून फिरणे हे प्रकार होतात. आपलं ५ वर्षातलं अपयश लुंगीमध्ये लपवण्याचा ते प्रयत्न करत असल्याचं शिवेंद्रराजे म्हणाले आहे.

Udayan Raje Bhosale
मी गाव गुंडाबद्दल बोलत होतो, त्याचं नाव मोदी आहे; पटोलेंचे स्पष्टीकरण

'राजकीय लोकांनाही आता फॅन्सी ड्रेस पार्टी करावी लागतेय हा जरा गमतीचा भाग आहे. नगरपालिकेची निवडणूक आली की, हे असं सगळं होतंय. लोकांचं लक्ष विचलीत करण्यासाठी हा प्रयत्न आहे. त्यामुळे सातारकरांनी त्यांच्याकडे फक्त मनोरंजन म्हणून पाहावं' अशी टीका शिवेंद्र राजेंनी केल्याचं वृत्त साम टीव्हीने दिलं आहे.

Udayan Raje Bhosale
उदयनराजेंनी लुंगी घालून केले फोटो सेशन; 'पुष्पा' गाण्यावर धरला ठेका; पाहा व्हिडिओ

दरम्यान, उदयनराजे रविवारी साताऱ्याच्या पोवई नाक्यावरील राजधानी सेल्फी पॉईंटवर चक्क लुंगी नेसून पोहचले. या प्रसंगी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह फोटोसेशन केले.त्यानंतर ते आपल्या गाडीत जाऊन बसले असता गाडीत पुष्पा चित्रपटाचे गाणं सुरु होते. या गाण्यावर फ्लाईंग किस देत त्यांनी स्वतःची कॉलर उडवली. आणि सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच पडल्या. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार वायरल होतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com