Shivendraraje Bhosale: ‘कास’ रिंगरोडच्या भूसंपादनास २० कोटी लागणार: मंत्री शिवेंद्रराजे; 'बांधकाम विभाग' रस्ता करणार

Satara News : पुलाऐवजी शाहूनगरमार्गे किल्ले अजिंक्यतारावरून पॉवर हाऊस या रिंग रोडचा प्रस्ताव पुढे आला आहे. त्यास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर कामाची गती वाढेल, असा विश्‍वास सार्वजनिक बांधकामंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
Shivendraraje Bhosale
Shivendraraje BhosaleSakal
Updated on

सातारा : कास, ठोसेघरला जाणाऱ्या पर्यटकांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी अदालतवाड्यापासून समर्थ मंदिरमार्गे बोगदा या मार्गावर पूल बांधता येईल का, याची चाचपणी करण्यात आली; परंतु या भागात बहुतांश घरे जुनी असल्याने कामादरम्यान त्यांना धोका पोचू शकतो, असा अभिप्राय त्रयस्थ यंत्रणेकडून आला. यामुळे पुलाऐवजी शाहूनगरमार्गे किल्ले अजिंक्यतारावरून पॉवर हाऊस या रिंग रोडचा प्रस्ताव पुढे आला आहे. त्यास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर कामाची गती वाढेल, असा विश्‍वास सार्वजनिक बांधकामंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com