Shivendraraje Bhosale: जो पाटणला निर्णय तोच मेढ्यात: मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची स्पष्टोक्ती; पालकमंत्र्यांच्या मेळाव्याला उत्तर देताना काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale hits back at Guardian Minister: मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की मागच्या आठवड्यात शिवसेनेचा मेळावा झाला. त्यांनी पालकमंत्र्यांना आणले होते. पालकमंत्री युतीबाबत बोलले; पण आम्हाला कोणी कमी लेखू नये. आमचे म्हणणे, जो निर्णय तुम्ही पाटण तालुक्यात घ्याल, तोच महायुती म्हणून आम्ही मेढ्यात घेऊ.
कास : तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. ज्येष्ठ आहात. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष म्हणून जो निर्णय तुम्ही पाटणमध्ये घ्याल, तोच निर्णय मेढ्यात होईल, अशी स्पष्टोक्ती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढ्यात दिली.