बाकी साडेचार वर्ष यांनाच हुडकायची वेळ येते; शिवेंद्रराजेंचा टोला

Shivendrasinharaje Bhosle-Udayanraje Bhosale
Shivendrasinharaje Bhosle-Udayanraje Bhosaleesakal
Summary

'काही लोकांना नागरिकांच्या प्रश्नांचं काहीही देणं-घेणं नसतं; पण निवडणूक जवळ आली की..'

सातारा : काही लोकांना नागरिकांच्या प्रश्नांचं काहीही देणं-घेणं नसतं. पण, निवडणूक जवळ आली की, अशा लोकांना राजकीय स्वार्थ स्वस्थ बसू देत नाही आणि मग हेच लोक जनतेबद्दल खोटा कळवळा आणून मोठ-मोठ्या थापा मारतात. यांना विकासाशी काहीही देणंघेणं नाही. यांना नागरिक फक्त निवडणूक आली की दिसतात, बाकी साडेचार वर्षे यांनाच हुडकायची वेळ जनतेवर येत असते आणि हे वास्तव जनतेला माहिती आहे, अशी टीका सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा नामोल्लेख टाळून केली.

Shivendrasinharaje Bhosle-Udayanraje Bhosale
राजकीय धुरळ्यानं समीकरण बदलणार? थेट भाजप आमदारचं अजितदादांच्या 'प्रेमात'

शाहूपुरीसाठीच्या कण्हेर पाणी पुरवठा योजनेच्या (Kanher Water Supply Scheme) जलपूजन आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते ५ सुवासिनींना जलकुंभ देऊन या योजनेचं लोकार्पण करण्यात आलं, तसेच सुमारे १० वर्षांपूर्वी दुषित पाण्यामुळे मृत्यू पावलेल्या सात महिन्यांच्या गर्भवती भगिनीच्या पवित्र स्मृतीस ही योजना समर्पित करण्यात आली. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, कण्हेर धरण बांधकामावेळी कै. भाऊसाहेब महाराजांनी दूरदृष्टी ठेऊन भविष्यात सातारा शहर व परिसरासाठी कण्हेरच्या पाण्याची गरज लागू शकते, यासाठी धरणस्थळी स्वतंत्र तांत्रिक तरतूद केल्यानेच आज एवढ्या सहजासहजी या पाणी योजनेचा लाभ होत आहे. मध्यंतरीच्या काळात दिलीप सोपल पाणी पुरवठा मंत्री असताना ही ३१ कोटींची योजना मी स्वतः पाठपुरावा करून मंजूर करून घेतली होती. सुदैवाने लोकवर्गणीची अट रद्द झाल्याने ही योजना मार्गी लागण्यातील मुख्य अडथळा दूर होऊन नंतर लागणारा अतिरिक्त १२ कोटींचा निधी सुध्दा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून मंजूर करून घेतला व त्याची फलश्रुती म्हणून आज या योजनेचे पाणी प्रत्यक्षात शाहूपुरीत येऊन दाखल झाले आहे.''

Shivendrasinharaje Bhosle-Udayanraje Bhosale
'महाविकास आघाडी सरकार पडेल, राणेंच्या रुपानं आणखी एक माणूस आलाय'

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ''विरोधक म्हणत आहेत की कै. भाऊसाहेब महाराजांमुळे (Bhausaheb Maharaj) २० वर्ष शाहूपुरीस पाण्यापासून वंचित राहावे लागले. त्यांचा हा आरोप धादांत खोटा आहे. कारण २० वर्षांचा विचार करता हेच १० वर्ष खासदार होते. शाहूपुरी येथे यांच्याच गटाची सत्ता होती. त्याचा विचार करता यांना कोणी अडवले होते. त्यामुळे या सगळ्या भूलथापा आहेत. यांना विकासाशी काहीही घेणंदेणं नाही. यांना नागरिक फक्त निवडणूक आली की दिसतात, बाकी साडेचार वर्षे यांनाच हुडकायची वेळ जनतेवर येत असते आणि हे वास्तव जनतेला माहिती आहे. त्यामुळे अशा भूलथापांना बळी न पडता शाश्वत विकासासाठी विधायक विचारांच्या पाठीशी उभे राहावे,'' असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com