मोठी बातमी! भाजप खासदार उदयनराजेंनी घेतली शरद पवारांची भेट

Sharad Pawar-Udayanraje Bhosale
Sharad Pawar-Udayanraje Bhosaleesakal
Summary

खासदार उदयनराजेंनी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

सातारा : जिल्हा बॅंकेची नुकतीच निवडणूक (Satara District Bank Election) पार पडली, त्यामुळं अजूनही साताऱ्यात 'राजकीय रंग' पहायला मिळत आहे आणि त्यातच भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या असल्यातरी, या भेटीतून आगामी काळात वेगळी राजकीय समीकरणं सातारा जिल्ह्यात उदयास येण्याची शक्यता आहे.

खासदार उदयनराजेंनी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळं सातारा लोकसभेची पोटनिवडणूक (Satara Lok Sabha By-Election) झाली. यामध्ये उदयनराजे यांना पराभव पत्करावा लागला, तर राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) सातारा लोकसभेचे खासदार झाले. उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडली असली तरी त्यांची शरद पवार यांच्यावर असलेले प्रेम व जवळीक संपलेली नाही. मध्यंतरी शरद पवार आजारी होते, त्यावेळी उदयनराजेंनी पुण्यात त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. त्यामुळं शरद पवार आणि उदयनराजे यांचं वेगळं नातं निर्माण झालं आहे. सध्या सातारा पालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी शरद पवार यांची घेतलेली ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. मध्यंतरी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर (Vikram Pawaskar) यांनी फलटणमधील कार्यक्रमात साताऱ्याचा खासदार निंबाळकर यांच्या सारखा असावा, असं वक्तव्य केलं होतं.

यावरून उदयनराजेंविषयी भाजपमध्ये नाराजी असल्याचं चित्र दिसतंय. त्यानंतर या चुकीच्या वक्तव्यावर खासदार निंबाळकर यांनी मी माढा मतदारसंघातूनच (Madha constituency) लढणार असून साताऱ्यातून उदयनराजे हेच खासदारकीसाठी योग्य आहेत, असं सांगून पावसकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं स्पष्ट केलं होतं, तर खासदार उदयनराजे यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही, पण त्यांच्या मनाला ही गोष्ट लागली आहे. मात्र, त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. संसदेच्या अधिवेशनासाठी खासदार उदयनराजे भोसले सध्या दिल्लीत मुक्कामी आहेत. आज दिल्लीत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी विविध विषयांवर चर्चा केल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com