
नागठाणे : शिवराष्ट्र ट्रेकर्स या संस्थेतर्फे दोन मोटारसायकल मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या. त्यात दक्षिण अन् मध्य भारतातील मोहिमांचा समावेश होता. शिवराष्ट्र ट्रेकर्स या संस्थेतर्फे दर वर्षी विविध प्रकारच्या दुर्गभ्रमंती मोहिमांचे आयोजन करण्यात येते. यंदा संस्थेने दुचाकीवरून या मोहिमा आयोजिल्या होत्या. त्यातील सहभागी सदस्यांनी विविध गडकिल्ले, ऐतिहासिक स्थळे, मंदिरे आदींना भेटी दिल्या.