स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान; कंगनाच्या पोस्टरला सेनेनं मारले 'जोडे' I Kangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut

कंगनानं स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हजारो हुतात्म्यांचा अपमान केलाय.

स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान

sakal_logo
By
यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (सातारा) : कंगना राणावतनं (Kangana Ranaut) केलेल्या बेताल वक्तव्याचा तारळे विभाग शिवसेनेच्या (Tarle Division ShivSena) वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. कंगनानं स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हजारो हुतात्म्यांचा अपमान केलाय. असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्यावर पाणी फिरविणारे वक्तव्य आपल्या बालिश बुध्दीनं केलंय. अशा मस्तवाल कंगना राणावतच्या पोस्टरवर जोडे मारो आंदोलन शिवसेनेच्या वतीने येथे करण्यात आले. 'कंगना राणावत मुर्दाबाद, शिवसेना जिंदाबाद' अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंत शेलार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेलार म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याला जाज्वल्य इतिहास आहे. असंख्य भारतीयांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलीय. अनेकजण बंदिवान झाले. आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. लाखो भारतीयांनी लढून स्वातंत्र्य मिळविले. मात्र, ही अभिनेत्री त्यास भीक संबोधते यासारखे दुर्दैव नाही. हा स्वतंत्र भारताचाच अन् नागरिकांचा अपमान आहे. त्यामुळे तिला दिलेला पुरस्कार केंद्र सरकारनं मागे घ्यावा व तमाम भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

हेही वाचा: काँग्रेसच्या आणखी एका नेत्याकडून मोदींचं 'कौतुक'

Tarle Division ShivSena

Tarle Division ShivSena

यावेळी पाटण शिवसेना शहरप्रमुख शंकर कुंभार, नितीन शिंदे, अभिजित पाटील, बबनराव शिंदे, गजाभाऊ जाधव, विजय पवार, माणिक पवार, श्रीकांत सोनवले, सचिन जाधव, किरण सूर्यवंशी, सुनिल पवार, शंकर साळुंखे, रोहित खरात, अमोघ घाडगे, राजेंद्र चव्हाण, प्रकाश शिंदे, आशिष यादव, ओमकार बारटक्के आदी उपस्थित होते.

हेही वाचा: किम जोंग उनची तब्येत खालावली! हुकूमशहा एका महिन्यापासून 'बेपत्ता'

loading image
go to top