esakal | व्यवहार बंद ठेवा, अन्यथा आमच्या स्टाइलने करु; कन्नड व्यावसायिकांना शिवसेनेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

व्यवहार बंद ठेवा, अन्यथा आमच्या स्टाइलने करु; कन्नड व्यावसायिकांना शिवसेनेचा इशारा

व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनात भाग घेऊन सर्व व्यवहार बंद ठेवावेत, अन्यथा शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा श्री. जाधव यांनी दिला आहे.

व्यवहार बंद ठेवा, अन्यथा आमच्या स्टाइलने करु; कन्नड व्यावसायिकांना शिवसेनेचा इशारा

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : बेळगाव महापालिकेसमोरील लाल-पिवळा ध्वज हटविण्यासाठी सातारा-सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील कन्नड व्यावसायिकांनी शनिवार (ता.20) सर्व व्यवहार बंद ठेवावेत, अन्यथा शिवसेना स्टाइलने उत्तर देण्याचा इशारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला. या वेळी जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, तालुकाप्रमुख दत्ता नलावडे, शहरप्रमुख नीलेश मोरे, अतिश ननावरे आदी उपस्थित होते.
 
श्री. जाधव म्हणाले,"" सीमा भागातील बेळगाव महापालिकेसमोर कन्नड रक्षक वेदिका या संघटनेने लाल-पिवळा ध्वज बेकायदेशीरपणे उभा केला आहे. या ध्वजाला महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेने विरोध करत ध्वज हटविण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी होणाऱ्या मोर्चास बेळगाव प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. याचबरोबर सीमा भागातील मराठी भाषिकांची स्थानिक प्रशासन दडपशाही करत आहे. कर्नाटकातील कन्नड वेदिका संघटना सीमा भागातील नागरिकांवर अन्याय करत असून, त्यांना बेळगाव जिल्हा प्रशासन व पोलिस पाठीशी घालत आहेत. या घटनेचा शिवसेना निषेध करत सीमा भागातील नागरिकांसाठी रस्त्यावर उतरणार आहे.''
 
सातारा जिल्ह्यात सुमारे 100 कन्नड हॉटेलचालक व इतर व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. या व्यावसायिकांनी 20 मार्चला स्वयंस्फूर्तीने या आंदोलनात भाग घेऊन सर्व व्यवहार बंद ठेवावेत, अन्यथा शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा श्री. जाधव यांनी दिला आहे. 

सातारा : लग्न लावून देतो सांगून दोघांनी महिलेस लुबाडले

Video पाहा : काळजी घ्या घाबरु नका; लसीकरणासाठी ग्रामपंचायतस्तरावर केंद्र 

Edited By : Siddharth Latkar

loading image