
भुईंज: पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बदेवाडीनजीक (भुईंज) मागील टायरला घर्षणामुळे आग लागून शिवशाही बस खाक झाली. तब्बल ४० प्रवासी बसमधून प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. दरम्यान, बसचा टायर खराब असल्याने टायरने पेट घेतल्याचे घटनास्थळी बोलले जात होते. किसन वीर कारखान्याचा व वाई नगरपालिकेच्या अग्निशामक यंत्रणांना आग आटोक्यात आणण्यात यश आले.