

Woman Attacked and Dragged Off Road in Satara; Accused Injured by Angry Mob
sakal
सातारा: येथील संभाजीनगर परिसरात काल सायंकाळी एका तरुणीला गाडीवरून पाडून जबरदस्तीने ओढत नेऊन मारहाण व विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. तरुणीने जिवाच्या आकांताने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. युवतीला त्याच्या ताब्यातून सोडवून संतप्त नागरिकांनी केलेल्या मारहाणीत संबंधित युवक जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.