

Bizarre Incident in Satara: Man Crawls, Barks Like a Dog; Viral Video Alarms Citizens
Sakal
सातारा: सातारा जिल्ह्यात गुरुवारी धक्कादायक प्रकार घडला आहे. सातारा-रहिमतपूर रस्त्यावर अंगापूर फाट्याजवळ दुपारी रस्त्याच्या मध्यभागी एक तरुण दोन हात आणि गुडघ्यावर रांगत होता. मध्येच कुत्र्यासारखं दोन गुडघ्यांवर बसून दमलेल्या कुत्र्यासारखं तोंडातून जीभ बाहेर काढत होता. हा प्रकार पाहून नागरिकांची भांबेरी उडाली. सोशल मीडियावरही या युवकाच्या वर्तनाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.