esakal | Coronavirus : बेड मिळविण्यासाठी वशिलेबाजी; स्थानिक नेतेमंडळींची गोची!

बोलून बातमी शोधा

Oxygen Bed
Coronavirus : बेड मिळविण्यासाठी वशिलेबाजी; स्थानिक नेतेमंडळींची गोची!
sakal_logo
By
विशाल गुंजवटे

बिजवडी (सातारा) : कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे कोरोना सेंटरमध्ये बेड, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिरसह आदी सुविधा कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाबाधिताला उपचारासाठी त्यांचे कुटुंबीय धडपडत आहेत. मात्र, बाधितांची संख्या जास्त व बेडची संख्या यात मोठी तफावत जाणवत असल्याने बेड मिळत नाहीत.

बेड मिळविण्यासाठी वशिला लावण्याचा प्रयत्न स्थानिक नेतेमंडळी लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकाऱ्यांकडे करतायत. मात्र, वाढते रुग्ण व कमी पडणाऱ्या बेडमुळे नेतेमंडळीही हताश झाले असून, या संकटात रुग्णांसाठी आपल्याकडे शब्द टाकणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना व जनतेला काय उत्तर द्यायचे हा प्रश्न त्यांना पडत आहे. त्यामुळे नेतेमंडळींची चांगलीच गोची झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या या लाटेत बाधितांना कशीबशी बेडची व्यवस्था झालीच, तर ऑक्‍सिजन बेड मिळत नाही, व्हेंटिलेटर मिळत नाही, इंजेक्‍शन मिळत नाही अशा परिस्थितीत काय करायचे हा मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. बाधितांसाठी बेड मिळत नाही म्हटल्यावर तो मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक स्थानिक पुढाऱ्यांसह गण, गट, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरील नेत्यांकडे वशिला लावून बेडसाठी धडपड करत आहेत.

सातारकरांनाे! पालिकेने सुरक्षिततेसाठी घेतला तातडीने निर्णय

थोड्याफार रुग्णांना नेतेमंडळी मदत करताना दिसून येत आहेत. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे बाधितांसाठी बेडची बिकट अवस्था सुरू आहे. अशा परिस्थितीत बेड मागण्यासाठी संपर्क करणाऱ्यांना काय उत्तर द्यायचे या विवंचनेत ते दिसून येत आहेत. नेत्यांनी बेड उपलब्ध नाही सांगणे म्हणजे समोरच्यांना राग येणे स्वाभाविक. मग तो आपल्यापासून तुटणार त्याच्याबरोबर स्थानिक पुढाऱ्याचे आपण काम केले नाही, तर तो नाराज होणार या परिस्थितीत करायचे काय, अशा द्विधावस्थेत नेतेमंडळी अडकले आहेत. कोरोनाच्या या महामारीत सर्वांना बेड उपलब्ध होऊन वेळेवर उपचार मिळून रुग्ण लवकर बरे व्हावेत, या मानसिकतेत सर्वच नेतेमंडळी आहेत. मात्र, अपुरी यंत्रणा व वाढते रुग्ण याचा ताळमेळ बसत नसल्याने तेही निरुत्तर झाले आहेत.

लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करा; गृहराज्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

इच्छा असूनही ते करू शकत नाहीत मदत!

वाढत्या रुग्णसंख्येमुळे नेतेमंडळी हताश झाले असून, बेड उपलब्ध नाहीत असे सांगून वेळ मारून नेत आहेत. आपल्या मतदाराला मदत करण्याची इच्छा असूनही ते मदत करू शकत नाहीत, अशा परिस्थितीमुळे नेतेमंडळी समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Edited By : Balkrishna Madhale