
Shreya Sawant with her bronze medal in Junior Athletics, achieving 6th rank in Maharashtra.
Sakal
बावधन: वाघजाईवाडी (ता. वाई) येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी श्रेया श्रीकृष्ण सावंत हिने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथील स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. तिने एक हजार मीटर मिडले रिले क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकावले. संघात हंसिका तुपे, सई घाडगे, अनुष्का निकम आणि श्रेया सावंत यांचाही समावेश होता.