esakal | श्रीराम कारखान्याने आमचा अंत पाहू नये; संघर्ष कृती समितीचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Phaltan Taluka sangharsh kruti Committee

कामगारांनी नऊ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२० या कालावधीत साखळी उपोषण केले होते.

श्रीराम कारखान्याने आमचा अंत पाहू नये; संघर्ष कृती समितीचा इशारा

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (सातारा) : फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना (Shriram Co-operative Sugar Factory) व अर्कशाळेच्या सेवा निवृत्त कामगारांची ग्रॅच्युइटीची रक्कम मिळावी, म्हणून कामगारांनी आजपासून पुन्हा प्रांत अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केलीय. श्रीराम कारखाना व अर्कशाळेच्या २०१७ ते २०२० पर्यंत सेवा निवृत्त झालेल्या सुमारे अडीचशे कामगारांची ग्रॅच्युइटीची रक्कम कामगारांना मिळालेली नाही. सदर रक्कमेच्या मागणीसाठी यापूर्वी कामगारांनी नऊ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२० या एकदिवसाच्या कालावधीत साखळी उपोषण केले होते. तेव्हा या आंदोलनाची दखल घेणे कारखाना प्रशासनास भाग पडले होते.

त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारी संचालकांच्या लेखी पत्राने कामगारांची रक्कम फेब्रुवारी २०२१ अखेर अदा करण्याचे अश्वासन देण्यात आले होते. पैसे मिळतील या आशेने व्यवस्थापनावर विश्वास ठेवत कामगारांनी आपले आंदोलन स्थगित केले होते. कारखान्याने कायगारांना दिलेल्या लेखी पत्रानुसार फेब्रुवारी महिना उलटून आता सहा महिने होत आले, तरी कारखाना प्रशासनाकडून कामगारांचे देणे देण्याबाबत कुठलीही हालचाल होत नसल्याचे दिसून आल्याने फलटण तालुका संघर्ष कृती समितीचे (Phaltan Taluka sangharsh kruti Committee) अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम कारखाना व अर्कशाळेच्या सेवानिवृत्त कामगारांनी आज पुन्हा बेमुदत साखळी उपोषणास प्रारंभ केली आहे.

हेही वाचा: खंडाळ्यातील वीर धरणग्रस्तांच्या अडचणी सोडविणार; रामराजेंची ग्वाही

श्रीराम कारखाना व अर्कशाळेतील २५० कामगारांची प्रत्येकी सरासरी रक्कम पाच लाख रुपये धरले, तरी थकीत रक्कम १२ कोटी ५० लाखांच्या आसपास आहे. गत सहा महिन्यात चार सेवा निवृत्त कामगारांनी आजारपणात आपला जीव गमावला आहे. त्यांना पैशाची गरज होती. कारखाना प्रशासन आश्वासनांची पाने तोंडाला पुसून वेळ काढूपणाचे धोरण अवलंबित आहे, ही बाब निषेधार्ह आहे. परंतु, आता पैसे मिळाल्याशिवाय माघार नाही या दृढ निश्चयाने कामगार आंदोलनास बसले आहेत. कारखाना प्रशासनाने आमचा अंत पाहू नये.

-ॲड. नरसिंह निकम अध्यक्ष, फलटण तालुका संघर्ष कृती समिती

loading image
go to top