

Kindness in Action: Support Grows for Nazia’s Medical Fight
sakal
-अमोल जाधव
शेणोली: कोल्हापूर येथील डॉ. प्रभू हॉस्पिटलमध्ये शेरे स्टेशन येथील नाझिया रफीक नदाफ हिच्यावर गंभीर आजारपणासाठी उपचार सुरू आहेत. सहा महिन्यांपूर्वी तिला अर्धांगवायूचा धक्का बसला. त्यातून तिचा जीवदान मिळाले असले, तरी तिच्यावर मोठा आघात झाल्याने उपचार सुरू आहेत. यासाठी खर्चही मोठा आहे. हा खर्च पेलण्यासाठी तिच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शेरेतील माऊली ग्रामविकास प्रतिष्ठान व ग्रामस्थांनी तिच्यासाठी धाव घेतली आहे.