

Sahil Jadhav From Satara Rises to Asian Games Gold After Six Years of Struggle Dedication and Determination in Archery
sakal
-सुनील शेडगे
नागठाणे : साताऱ्याच्या साहिल जाधवने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. त्याने चिकिथा तनिपार्थी हिच्या साथीने कंपाऊंड मिश्र सांघिक तिरंदाजीत यश पटकाविले. त्या निमित्ताने २०२८ मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे स्थानही निश्चित झाले आहे.