
हुमगाव : हुमगावच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमित्राच्या उपचारासाठी ५१ हजार रुपयांचा निधी जमा करत मदत केली. रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील १९९०-९१ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे नुकतेच स्नेहसंमेलन झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेले वर्गमित्र एकमेकांच्या संपर्कात राहात आहेत.