
अपघात झाल्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
कऱ्हाड (जि. सातारा) : एसटीने दुचाकीला दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या जवानाचा उपचारावेळी मृत्यू झाला. येथील कोल्हापूर नाक्यावरील बागवान ट्रान्स्पोर्टजवळ शनिवारी रात्री उशिरा अपघात झाला होता. जयवंत बाबासाहेब नलवडे (वय 50, रा. सोनकिर, ता. कडेगाव) असे अपघातातील मृताचे नाव आहे.
पोलिसांची दिलेली माहिती अशी, नलवडे शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पत्नीसह कोल्हापूर नाका परिसरात निघाले होते. त्यावेळी बागवान ट्रान्स्पोर्टसमोर मागून आलेल्या एसटीने नलवडे यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेत नलवडे व त्यांची पत्नी गाडीवरून खाली कोसळल्या. अपघातात नलवडे यांना गंभीर दुखापत झाली.
त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. नलवडे सुभेदार पदावर आहेत. त्यांचे प्रमोशन होणार होते. मात्र, त्यापूर्वीच चार दिवस आधी काळाने त्यांच्यावर घाला घातला.
कराड जनता'च्या 296 कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा
नवरी साेबत फोटो काढून येईपर्यंत कोणीतरी त्यांची पर्स लांबवली होती
जय शिवराय! महाराष्ट्रातील या मावळ्याचे सर्वस्तरातून काैतुक हाेत आहे
कोरोनाचा उद्रेक : सातारा जिल्ह्यातील दहिवडी शहरच कंटेन्मेंट झोन घोषित
चहाच्या वाफाळत्या कपासोबत एक नजर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या घडामोडींवर... फक्त एका क्लिकवर...
Edited By : Siddharth Latkar