
अनेक ठिकाणी प्रिमियम पेट्रोलचे दर 100 रुपयांच्यावर गेले आहेत. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर मालिकेचे पैसे थकविल्याचा आरोप केला.
अमेरिकेच्यावतीने राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्याचा निर्णय. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाचे निदान.देशभरात पेट्रोलच्या किंमती भडकल्या आहेत. अनेक ठिकाणी प्रिमियम पेट्रोलचे दर 100 रुपयांच्यावर गेले आहेत. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर मालिकेचे पैसे थकविल्याचा आरोप केला.
वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनामुळे जगात सर्वाधिक मृत्यू झाले असून सोमवारी मृतांचा आकडा 5 लाखांवर पोहोचला. या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमेरिकेच्यावतीने राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. व्हाइट हाउसने सोमवारी याबाबती माहिती दिली होती. वाचा सविस्तर
नाशिक : जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागला असून, काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन, संचारबंदीसह कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच सोमवारी (ता.२२) साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाचे निदान झाल्यानंतर साहित्यिकांनी धसका घेतला आहे. वाचा सविस्तर
भोपाळ : आता मध्य प्रदेशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असून काँग्रेस आमदार बैजनाथ कुशवाह हे मास्क न घालता फिरताना दिसत होते. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी अजब असं वक्तव्य केलं आहे. वाचा सविस्तर
नवी दिल्ली : देशभरात पेट्रोलच्या किंमती भडकल्या आहेत. अनेक ठिकाणी प्रिमियम पेट्रोलचे दर 100 रुपयांच्यावर गेले आहेत. ग्राहकांपर्यंत पेट्रोल 90 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचत असलं तरी प्रत्यक्षात मात्र या पेट्रोलचा निर्मिती खर्च 30 ते 35 रुपये इतकाच आहे. वाचा सविस्तर
रियाध : मुस्लीम देश असणारा सौदी अरेबिया मोठे सामाजिक बदल करताना दिसत आहे. महिलांना मर्यादीत हक्क देणारा सौदी आता त्यांच्यासाठी अनेक दारे उघडत आहे. सिनेमा, ख्रिस्मस सेलिब्रेशन, महिलांना गाडी चालवण्याची परवानगी दिल्यानंतर सौदीने आता महिलांच्या लष्करातील सहभागाचा मार्ग खुला केला आहे. वाचा सविस्तर
मुंबई : व्हॅट्सअॅप , फेसबुक अशा सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणींच्या बनावट नावाने मैत्री करून आक्षेपार्य व्हिडिओ व फोटो चित्रीत करून ब्लॅकमेल करणाऱ्या बड्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यातील तिघा आरोपींना हरयाणा आणि राजस्थान येथून अटक करण्यात आली. वाचा सविस्तर
नागपूर ः बुधवारी शहरातील पाच झोनमधील वस्त्यांना पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिका व ओसीडब्लूने स्पष्ट केले आहे कारण.. वाचा सविस्तर
पुणे : प्रकल्प लांबला की खर्च वाढतो, असे म्हटले जाते; परंतु याला पुणे महापालिका अपवाद ठरली आहे. ‘जायका’ प्रकल्पासाठी फेरनिविदा काढण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या इस्टिमेट (पूर्वगणनपत्रक) वरून ही गोष्ट समोर आली आहे. वाचा सविस्तर
औरंगाबाद: महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातून राजकीय नेतेही सुटले नाहीत. छगन भुजबळ, राजेश टोपे अशा अनेक मुख्य नेत्यांसह आमदार, खासदारांंना कोरोनाची बाधा झाली आहे. वाचा सविस्तर
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर मालिकेचे पैसे थकविल्याचा आरोप केला. शर्मिष्ठाने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित कामाचे पैसे अजूनही मिळाले नसल्याची तक्रार केली. त्यानंतर मंदार देवस्थळींनीही फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांची बाजू मांडली. वाचा सविस्तर