Indian Army : वीर जवान तुझे सलाम, शहीद भोईटेंना अखेरचा निरोप; दीड वर्षाच्या चिमुरडीनं दिला भडाग्नी, कुटुंबीयांचा आक्रोश

वैभव भोईटे यांना वडील संपतराव भोईटे यांनी व कडेवर बसलेल्या दीड वर्षाची मुलगी हिंदवीने भडाग्नी दिला.
Jawan Vaibhav Bhoite Martyred
Jawan Vaibhav Bhoite Martyredesakal
Summary

ज्या तिरंग्यात लपेटून वैभव यांचे पार्थिव आणण्यात आले तो तिरंगा त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.

फलटण शहर : लडाख येथील लेहजवळ वाहन अपघातात हुतात्मा झालेले जवान वैभव संपतराव भोईटे (वय २३) यांना भोईटेवस्ती, राजाळे (ता. फलटण) येथे शासकीय इतमामात मानवंदना देत हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

या वेळी त्यांच्या (Jawan Vaibhav Bhoite) कुटुंबीयांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. वैभव भोईटे यांना वडील संपतराव भोईटे यांनी व कडेवर बसलेल्या दीड वर्षाची मुलगी हिंदवीने भडाग्नी दिला. लडाखमधील लेह जिल्ह्यात राजधानी लेहजवळ क्यारी गावातून जाताना भारतीय लष्कराचे (Indian Army) वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जवान हुतात्मा झाले.

Jawan Vaibhav Bhoite Martyred
Khambatki Tunnel : ब्रिटिशकालीन 'कात्रज' सुस्‍थितीत, 22 वर्षांचा 'खंबाटकी' कमकुवत का? प्रवाशांसाठी बोगदा ठरतोय जीवघेणा!

यामध्ये राजाळे (ता. फलटण) येथील वैभव संपतराव भोईटे हे हुतात्मा झाल्याचे वृत्त समजताच संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली. राजाळे गावात संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून व नागपंचमीचा सण साजरा न करून श्रद्धांजली वाहिली. हुतात्मा वैभव भोईटे यांचे पार्थिव लेहवरून दिल्ली, हैदराबादमार्गे पुणे येथे विमानाने आणण्यात आले. पुणे येथून विशेष वाहनातून राजाळे येथे आणण्यात आले.

लोणंद ते फलटण व फलटण ते राजाळे या मार्गावरील प्रत्येक गावामध्ये रस्त्याच्या दुतर्फा व मध्यभागी रांगोळी काढण्यात आली होती. गावोगावी भोईटे यांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावण्यात आले होते. राजाळे येथे वैभव यांच्या पार्थिवाचे आगमन सायंकाळी आठ वाजता झाले. तेथून भोईटे वस्ती येथे फुलांनी सजविलेल्या ट्रॉलीतून साडेआठच्या सुमारास निवासस्थानी आणण्यात आले.

या वेळी वीर जवान वैभव भोईटे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, जब तक सूरज चाँद रहेगा वैभव तेरा नाम रहेगा, इन्कलाब झिंदाबाद आशा घोषणांनी आसमंत निनादला. राजाळे येथून भोईटेवस्ती येथे त्यांच्या निवासस्थानी पार्थिव मुख दर्शनासाठी आणल्यानंतर त्यांची आई, वडील, पत्नी व कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.

Jawan Vaibhav Bhoite Martyred
लडाखमध्ये मोठी दुर्घटना! लष्करी वाहन दरीत कोसळून 9 जवानांचा मृत्यू; महाराष्ट्राचा जवानही शहीद

त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. यावेळी हजारो उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. भोईटे यांच्या निवासस्थानापासून नजीक असणाऱ्या मोकळ्या पटांगणावर वीर जवान भोईटे यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. तेथे हजारोंच्या जनसमुदायाने त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

यानंतर खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलिस उपअधीक्षक राहुल धस, राजाळे सरपंच स्वाती दोंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भाऊसो काळे, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, जिल्हा सैनिक मंडळ, कमांडिंग ऑफिसर ३११ मीडियम रेजिमेंट, कमांडिंग ऑफिसर २४ मराठा.

Jawan Vaibhav Bhoite Martyred
Prithviraj Chavan : 'वंचित'मुळे काँग्रेसचे अनेक खासदार पडले आणि त्याचा भाजपला फायदा झाला; चव्हाणांचा आंबेडकरांवर गंभीर आरोप

तसेच कर्नल ऑफ दि रेजिमेंट मराठा, जी ओसी महाराष्ट्र ॲण्ड गोवा, जी ओसी डीएम ॲण्ड जीएस एरिया, जीओसी इन सी हेडक्वार्टर साऊथर्न कमांड, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, मेकनाईझ रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांसह विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर पोलिस प्रशासन व सैन्य दलाच्या वतीने प्रत्येकी तीन फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली.

यानंतर ज्या तिरंग्यात लपेटून वैभव यांचे पार्थिव आणण्यात आले तो तिरंगा त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. यानंतर त्यांच्या पार्थिवास वडील संपतराव भोईटे यांनी व कडेवर बसलेल्या दीड वर्षाची मुलगी हिंदवीने भडाग्नी दिला. या वेळी आजी माजी सैनिक संघटना, विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक व सेवाभावी संघटनांचे प्रतिनिधी फलटण तालुक्यातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jawan Vaibhav Bhoite Martyred
Highway Accident : रामलिंग दर्शनासाठी जाताना काळाची झडप; एसटी-रिक्षाच्या भीषण अपघातात तीन भाविक ठार, दोन जण जखमी

शनिवारी पहाटे झाले होते मायलेकरांचे बोलणे

वैभव भोईटे यांनी शनिवारी पहाटे चार वाजता आईला फोन केला होता व आपण लेह- लडाखला मोहिमेसाठी निघालो असल्याचे सांगत तुझी आठवण आल्याने इतक्या पहाटे फोन केल्याचे सांगितले. माय-लेकरांचे बोलणे झाल्यानंतर काही तासांतच लष्करी वाहनाच्या अपघाताची दुर्दैवी घटना घडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com