सांडपाणी निचऱ्यासाठी ग्रामपंचायत सरसावली

गोंदवल्यात समाधी मंदिर समितीकडूनही उपाय; चर काढून पाणी ओढ्यात
Solutions for Sewage Drainage by Gondavale Gram Panchayat
Solutions for Sewage Drainage by Gondavale Gram Panchayat

गोंदवले - हरित वसुंधरा उपक्रमांतर्गत सुरू झालेले मोधळ ओढ्याच्या स्वच्छतेचे काम अपूर्ण राहिल्याने येथे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत दै.‘सकाळ’ने आवाज उठवताच ग्रामपंचायतीसह समाधी मंदिर समितीने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. ओढ्यात चर काढून सांडपाणी वाहते केले असले, तरी हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे.

दहिवडी रस्त्यावरील मोधळ ओढ्यात साचणाऱ्या सांडपाण्याने येथे दुर्गंधी व आरोग्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पुढाकार घेतला. हरित वसुंधरा उपक्रमांतर्गत या ओढ्याच्या स्वच्छतेबरोबरच सुशोभीकरण करण्यासह माण नदीला लागून बाह्यरस्ता करण्याचा संकल्प केला. त्यानुसार बहुतांशी काम पूर्ण केले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हे काम अपूर्ण राहिल्याने ओढ्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचून राहिले. त्यातच रिमझिम पावसाची भर पडल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव होऊन आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला.

याबाबत दै.‘सकाळ’ने रविवारच्या (ता. १७) अंकात वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्या बातमीची दखल घेऊन सरपंच जयप्रकाश कट्टे, उपसरपंच संजय माने, सदस्य पंकज पाटील, प्रवीण कट्टे, डॉ. राजेंद्र अवघडे, शिवसेनेचे तानाजी कट्टे, ग्रामविकास अधिकारी अमोल पवार, समाधी मंदिर समितीच्या वतीने परिसराची तत्काळ पाहणी केली. ओढ्याचे रुंदीकरण, खोलीकरण केल्याने मोठ्या प्रमाणात साचून राहणाऱ्या सांडपाण्याचा तात्पुरता निचरा करण्यासाठी श्री ब्रह्मचैतन्य महाराज ट्रस्टच्या वतीने जेसीबीच्या साह्याने चर काढण्यात आली. शिवाय तातडीने डास निर्मूलन करण्यासाठी सांडपाण्यावर जळके ऑइलही टाकले. गावात सर्वत्र निर्जंतुकीकरणासाठी धूर फवारणी करून डास निर्मूलन अभियान राबविण्यात येणार असल्याचे सरपंच कट्टे यांनी सांगितले. त्यामुळे आता या परिसरात रोगराईची समस्या आटोक्यात येण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com