प्राधिकरणाविरोधात पालिका आक्रमक; रीडिंग न घेताच बिले दिल्याने 'वाद'

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन पुकारला असल्याने अनेक व्यवसाय, धंदे ठप्प आहेत.
Jeevan Pradhikaran
Jeevan Pradhikaranesakal

सातारा : पाणी वापराची नोंद न घेताच ग्राहकांना पाणी बिल (Water Bill) देण्यात येत असल्याच्या कारणावरून आज पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती सीता हादगे (Speaker Sita Hadage) यांनी प्राधिकरणाच्या (Jeevan Pradhikaran) मुख्य अभियंत्यांना त्याबाबतचे निवेदन दिले. या निवेदनात हा प्रकार न थांबल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना माजी उपसरपंच राजेंद्र गिरीगोसावी, रमेश धुमाळ, अजित ग्रामोपाध्ये, संदीप सावंत आदी उपस्थित होते. (Speaker Sita Hadage Agitation Against Jeevan Pradhikaran Satara News)

निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन पुकारला असल्याने अनेक व्यवसाय, धंदे ठप्प आहेत. याच काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. अशा अडचणीच्या काळात प्राधिकरण शाहूपुरीसह इतर उपनगरांतील ग्राहकांना नोंदी न घेताच पाणी बिले देत आहे. यामुळे ग्राहकांच्या हातात अव्वाच्या सव्वा रकमेची बिले पडत असून, त्याचा धक्का नाहक नागरिकांना बसत आहे. हे प्रकार टाळत प्राधिकरणाने जागेवर जाऊन पाहणी करत दिलेल्या बिलांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापुढील काळात प्राधिकरणाने असे प्रकार न टाळल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

Good News : वित्त आयोगाच्या व्याजाच्या पैशातून नागरिकांना मिळणार मोफत लस!

Speaker Sita Hadage Agitation Against Jeevan Pradhikaran Satara News

Jeevan Pradhikaran
जीवन प्राधिकरणाची रीडिंग न घेताच बिले; खासदार, आमदार तक्रारींची घेणार दखल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com