
सातारा : अभिजात मराठी भाषेचा उत्सव असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्य अन् सांस्कृतिक जडणघडणीतील एक महत्त्वाचे पान. पुढील वर्षी साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील खण आळीतील पाठकजी कुटुंबीयांनी साहित्य संमेलनाच्या विशेष सजावटीद्वारे त्यांच्या घरी ‘ज्ञानगणेश’ साकारला आहे. त्याची मोठी चर्चा सध्या होत आहे.