ST Bus
ST Busesakal

तीन आठवड्यांनंतर कऱ्हाडहून पहिली ST बस पुण्याला रवाना

Published on
Summary

ऐन दिवाळीचा सण संपवून प्रवासी गावी जाण्याच्या तयारीत असताना सर्व डेपो बंद होते.

कऱ्हाड (सातारा) : मागील तीन आठवड्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Staff Strike) संप सुरुच असतानाच कऱ्हाड (जि. सातारा) आगारात (Karad Depot) आज एक चालक आणि वाहक हजर झाले. त्यामुळे त्यांच्यामार्फत येथील आज शनिवारी कऱ्हाड-स्वारगेट ही पहिली एसटीबस रवाना करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक विजय मोरे (Depot Manager Vijay More) यांनी दिली.

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळं ऐन दिवाळीचा सण संपवून प्रवासी गावी जाण्याच्या तयारीत असताना सर्व डेपो बंद होते. या संपात सुरुवातीला चालक, वाहकांसह सर्वच प्रशासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळं सर्व एसटी बस जागेवरच उभ्या आहेत. या परिस्थितीमुळं सतत वर्दळ असलेल्या बस स्थानकांमधील वाहतूक ठप्प झाली होती. मागील तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी संपकरी व राज्य शासनाने तीन बैठका घेतल्या.

ST Bus
'बंटी पाटलांनी जवळीकता इतकी वाढवली, की भाजपलाही पत्ता लागला नाही'

यामध्ये कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगारवाढ केल्याचे सांगण्यात आले. मात्र, कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण या मुद्यावर ठाम राहत आंदोलन सुरूच ठेवले आहे. कामगारांनी बंदचा नारा दिल्याने पुन्हा पगारवाढ केल्याने मागे घेतल्याचे संपाचे नेतृत्व केलेल्या सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) व गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) जाहीर केले. मात्र, अद्यापही कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलीनीकरण या मुद्द्यावर ठाम राहत संप सुरूच ठेवला आहे. दरम्यान, आज कऱ्हाड आगारात एक चालक आणि वाहक हजर झाले. त्यामुळं त्यांच्यामार्फत येथील एसटी आगारातून कऱ्हाड-स्वारगेट ही पहिली एसटीबस रवाना करण्यात आल्याचे आगार व्यवस्थापक श्री. मोरे यांनी सांगितले.

ST Bus
मुंबईच्या गुंडगिरीला 'सातारी हिसका' सोसणार नाही : शिवेंद्रराजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com