पांडुरंगा सरकारला सुबुद्धी दे; ST कर्मचाऱ्यांची टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Employees

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या काम बंद आंदोलनाला 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे.

ST कर्मचाऱ्यांची टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडी

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : जय जय राम कृष्ण हरी... च्या गजरात एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employees) आज एसटीचे शासनात विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी भागवत एकादशीची (Bhagwat Ekadashi) औचित्य साधून कुटुंबीयासह दिंडी काढली. टाळ-मृदुंगाच्या गजरात काढण्यात आलेली दिंडी येथील बस स्थानकापासून तहसीलदार कार्यालयासमोर (Tehsil Office) नेवून तिथे तहसीलदारांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाचे (State Transport Corporation) राज्य सरकारमध्ये विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी आठ दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. त्याअंतर्गत येथील एसटी आगारासमोर सर्व संघटनांचे कर्मचारी एकत्र येवून त्यांनी बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्यावर ठिय्या मारला आहे. दरम्यान, आज भागवत एकादशी आणि पंढरपूरची यात्रा आहे. त्याचे औचित्य साधून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह तहसीलदार कार्यालयावर दिंडी काढली.

हेही वाचा: 'शिवशाहीर बाबासाहेबांची 'ही' इच्छा आता सरकारनच पूर्ण करावी'

बस स्थानकापासून दिंडी दत्त चौकात नेण्यात आली. तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन दिंडी तहसीलदार कार्यालयासमोर नेण्यात आली. एसटी आमच्या घामाची, नाही कुणाच्या बापाची... कोण म्हणतो देत न्हाय, घेतल्याशिवाय राहत नाय..., एसटीचे राज्य शासनात विलगीकरण झालेच पाहिजे या ना अशा घोषणा देण्यात आल्या. तेथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटीचे शासनात विलगीकरण का आवश्यक आहे, याचे विवेचन केले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीने नायब तहसीलदार तांबे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तेथे कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार केला.

हेही वाचा: काहीही बरळणाऱ्यांना राजाश्रय आणि पुरस्कार मिळतो : पृथ्वीराज चव्हाण

बळीराजा शेतकरी संघटनेचा पाठिंबा

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या काम बंद आंदोलनाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. त्यासाठी आज दिंडी काढण्यात आली. त्यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, प्रदेशाध्यक्ष बी.जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

loading image
go to top