आरक्षणप्रश्‍नी धनगर कृती समिती आक्रमक

आरक्षणप्रश्‍नी धनगर कृती समिती आक्रमक

दहिवडी (जि. सातारा) : धनगर आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, या मागणीचे निवेदन गुरुवारी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसीलदार बाई माने यांना देण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अर्जुन काळे, दादासाहेब काळे, वसंतराव सजगणे, अमृत चौगुले आदी उपस्थित होते. 

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की धनगर समाजाची राजकीय, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्थिती हलाखीची व बिकट झालेली आहे. यामधून धनगर समाजाची उन्नती होण्यासाठी यापूर्वीच महाराष्ट्राच्या यादीत धनगर समाजाचा आदिवासीत समावेश आहे. तथापि, धनगरऐवजी धनगड उल्लेख झाल्यामुळे समाजाला आरक्षणाचे फायदे मिळू शकत नाहीत. ही दुरुस्ती होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या आदिवासींच्या यादीमध्ये अनुक्रमांक 36 वर धनगडऐवजी धनगर अशी दुरुस्ती केंद्र शासनाने करणेबाबतची शिफारस करावी. 

केंद्र शासनाने याबाबतचे बिल तयार करून संसदेत मंजूर करावे किंवा संसदेत सादर झालेल्या 325 क्रमांकाच्या बिलामध्ये ही दुरुस्ती टाकून बिल मंजूर करावे किंवा या दुरुस्तीबाबतचा राष्ट्रपतींच्या मान्यतेने आदेश त्वरित काढण्यात यावा, अशी विनंती धनगर समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. निवेदन तहसीलदारांनी त्यांच्या शिफारशीसह मुख्यमंत्र्यांना सादर करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. या वेळी शार्दूल किसवे, अविनाश बरकडे, कैलास दडस, सचिन बरकडे, दादा दडस, सुशांत जानकर उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com