नुकसानीच्या पंचनाम्यास दिरंगाई, किसान क्रांती संघटना आक्रमक

नुकसानीच्या पंचनाम्यास दिरंगाई, किसान क्रांती संघटना आक्रमक

वाई (जि. सातारा) : येथील किसान क्रांती संघटेच्या वतीने शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप नाकारणे, एमएसपीनुसार शेतमाल खरेदी न करणे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यास दिरंगाई याबाबत तहसीलदार रणजित भोसले यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. या वेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष युगल घाडगे व राहुल जायगुडे उपस्थित होते. 

बाजार समिती व बाजार समित्यांबाहेर असणारे व्यापारी शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एम.एस.पी.पेक्षा फारच कमी दराने शेतमाल खरेदी करीत आहेत. याबाबत बाजार समिती व व्यापारी यांना एम.एम.पी.नुसार शेतमाल खरेदीसाठी सक्त आदेश काढावेत. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामे काही भागात झाले नाहीत. तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com