
Karhad police recovering stolen mobile phones worth ₹7 lakh and returning them to their rightful owners.
Sakal
कऱ्हाड: तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेले २२ तक्रारदारांचे सात लाख रुपयांचे मोबाईल मूळ मालकांना तालुका पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या हस्ते परत देण्यात आले. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील तक्रारदारांचे गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या.