टोल नाक्यावरील गुंडगिरी थांबवा; बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन गडकरींना साकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोल नाक्यावरील गुंडगिरी थांबवा - बळीराजा शेतकरी संघटना

टोल नाक्यावरील गुंडगिरी थांबवा - बळीराजा शेतकरी संघटना

कऱ्हाड : पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाक्यावर एमएच १२ पासिंगच्या गाड्यांना टोलमाफी आहे. त्या पध्दतीने सातारा जिल्ह्यातील आनेवाडी तासवडे टोलनाक्यावर एमएच ११ आणि एमएच ५० पासिंगच्या गाड्यांना टोलमाफी करावी आणि टोलनाक्यावरील गुंडगीरी थांबवावी या मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आल्याची माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला यांनी दिली.

हेही वाचा: नागपूर शहरातून वाढली गायींची तस्करी, कत्तल!

मुल्ला म्हणाले, खेड शिवापूर, आणेवाडी, तासवडे आणि किणी टोलनाका प्रशासनाच्या भोंगळ कारभार आणि गुंडगिरी तातडीने थांबवायली हवी. सातारा जिल्ह्यात दोन टोलनाके आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाक्यावर एमएच १२ पासिंगच्या गाड्यांना टोलमाफी आहे. त्या पध्दतीने सातारा जिल्ह्यातील आनेवाडी तासवडे टोलनाक्यावर एमएच ११ आणि एमएच ५० पासिंगच्या गाड्यांना टोलमाफी करावी.

मोठ्या प्रमाणात टोल वसुली होते परंतू त्याबदल्यात प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत. पुणे ते कागल महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात वाढले आहेत. पिण्याचे स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही, टॉयलेटची व्यवस्था नाही. कऱ्हाड- चिपळूण, कऱ्हाड- विजापूर, कऱ्हाड-तासगाव या रस्त्याचं काम तीन ते चार वर्षे झाले सुरु आहे. त्या कामांना गती मिळावी. रस्त्याच्या कामात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या मोबदला तातडीने द्यावा, असे सांगीतले. त्यावर मंत्री गडकरी यांनी याबाबत सकारात्मक विचार करू अशी ग्वाही दिल्याचेही मुल्ला यांनी सांगितले.

loading image
go to top