चिलीम आणि कोंबडीचं रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होताे...!

चिलीम आणि कोंबडीचं रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होताे...!

सातारा : सातारा जिल्हा हा अंधश्रद्धा निमुर्लन संस्थेचे संस्थापक नरेंद्र दाभाेलकरांचा. या जिल्ह्यात बुवाबाजीच्या अनेक घटना आजही उघडकीस येत आहेत. ही बुवाबाजी मुळासकट उपटून टाकण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. परंतु तसे
हाेताना दिसत नाही हे देखील तितकेच खरं आहे. या जिल्ह्यातील वाई तालुक्‍याला ऐतिहासिक परंपरा आहे. पुण्याप्रमाणे वाईदेखील शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. अशा सुसंस्कृत वाई तालुक्‍यात काही ठिकाण अशी आहेत जेथे जाऊन आजही लाेक देवाला काैल लावतात. त्यातील एका ठिकाणाची उघड उघड न होता दबक्या आवाजात कायम होत असते.

या ठिकाणी म्हणे अमावस्येच्या रात्री प्रदिर्घ काळ पूजा अर्चा चालते. तांत्रिक मांत्रिक या मंदिरात येतात. त्यांच्या समोर काळी बाहुली असते. एक एक करत मंत्र म्हणला जातो. हा मंत्र विशिष्ट संख्येत म्हणजेच 21 हजार वेळा म्हटला जातो. त्यात कमी जास्त झाला तर ताे पुन्हा म्हणायचा असा नियम आहे. एक एक करत समोरच्या बाहुलीत २१ सुया टोचल्या जातात. सर्व सोपस्कार झाले की ज्याच्या नावाने बाहुली असते तो मरतो. आता ही गाेष्ट म्हणजे एक प्रकारची अंधश्रद्धाच म्हणावी लागेल असे ग्रामस्थ सांगतात. परंतु धावजी पाटलांचे भक्त मात्र म्हणतात देवाने काळुबाईची पूजा केली. वशीकरण, अघोरी विद्या हि भक्तांच्या चांगल्यासाठी वापरली. भूत, प्रेत, पिशाच्य बाधलं की लोक देवाचा (धावजी पाटालांचा) धावा करतात. इथं तुम्ही म्हणत आहात तसं काही नसतं बरं का असे एका ग्रामस्थांने खडसावून सांगितलं. हे मंदिर देवाचे मंदिर आहे असे ही त्यांनी स्पष्ट केले. खरं तर याला काळ्या जादूचं शक्तिपीठच समजलं जातं असेही म्हणतात. 

साहेब! आम्हांला वाळीत टाकलय; शेलार कुटुंबीयांतील महिलांची तहसीलदारांकडे धाव 

सुरूर गावातलं धावजी पाटील मंदिर

या मंदीराची आख्यायिकाच काळ्या जादूशी संबधित असल्याने काळ्या जादूचं शक्तिपीठ म्हणूनच मंदिराला ओळख मिळाली. एखादी चिलीम आणि कोंबडीच ताज रक्त दिली की धावजी पाटील प्रसन्न होवून काम करतो अशी लोकांची श्रद्धा आहे म्हणे (आमचा अंधश्रद्धा पसरविण्याचा हेतू नाही). आपली इच्छा पुर्ण व्हावी यासाठी भक्तगण येथे गर्दी करतात. 

येथील काही ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर त्यांना धावजी पाटलाविषयी ठाेस काही सांगता आले नाही. परंतु काही वयस्कर मंडळींनी धावजीचा जन्म या गावाच्या परिसरात झाला होता असे सांगितले. धावजी मोठ्ठा झाला तसा त्याचा तंत्र, मंत्र, काळीविद्या याकडे कल वाढला. कुटुंबियांनी त्याचे लग्न केले परंतु त्याच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही असेही सांगण्यात आले. धावजी पाटील तंत्र, मंत्राचा नाद सोडून देत नव्हता.

धावजीने पत्नीला सोडून बंगाल गाठले. तेथे ताे काळी जादू शिकण्यासाठी गेल्याची चर्चा हाेती. रानावनात भटकत असताना त्याला एका साधूनेच कलकत्याला जावून कालीमातेची पूजा करण्याचा माैलिक सल्ला दिला होता असंही सांगितले जाते. धावजी कलकत्त्यात 14 वर्ष राहिला. याच काळात तो काळी जादू, तंत्रविद्या यामध्ये पारांगत झाला. कलकत्यात असताना त्याला कालीमातेने दृष्टांत दिला. तू आपल्या घरी जा. तेथील लोकांची सेवा कर. यामुळेच ते आपल्या गावी परतल्याचे दावा भक्तांकडून केला जात आहे.

सुमारे १४ वर्षांनंतर धावजी पाटील पुन्हा आपल्या गावी आला. १४ वर्षांनंतर नवऱ्याला पाहून धावजीच्या बायकोने त्याचा तिरस्कार केला. धावजी पुन्हा गावात आल्याचा आनंद काेणालाच झाला नाही. उलट लाेक त्याच्यापासून दूर राहण्यातच पसंतीत राहिले. असे असताना एकदिवस शेतात नांगरणी चालू असताना धावजीने चमत्कार दाखवल्याच दावा भक्तांनी केला.

एक शेतकरी आपल्या शेतात चार बैलजोड्या घेवून नांगऱणी करु लागला होता. अचानक धावजी पाटलांनी पुकारा केला. बैलांचे दोर घेतले आणि आकाशात भिरकावले त्या सोबत आठही बैल दोरांबरोबर आकाशात झेपावले. ते आकाशात गोल गोल फिरू लागले. हि दंतकथा धावजी पाटलांसोबत जोडली गेली आणि धावजी पाटील लोकांचे देव झाले. (आमचा अंधश्रद्धा पसरविण्याचा काेणताही हेतू नाही)त्यानंतर धावजी पाटलांकडे लोकांची गर्दी वाढू लागली. ही गर्दी खरंतर स्वत:च्या फायद्यासाठी पेक्षा दूसऱ्याच्या नुकसानासाठी जास्त असायची म्हणे. धावजी काळ्या जादूने लोकांना चमत्कार दाखवू लागले. काही काळासाठी लोक भक्त झाले पण पुन्हा धावजी पाटलांची भितीच जास्त बसली. काळी जादू, अघोरी मंत्र म्हणून लोकांनी धावजी पाटलांसोबत फारकत घेतली.

मध्यरात्रीच झाली माझी राजकीय पहाट!

पुन्हा कालीमातेचा उपासना 

त्यांच्या चमत्कारांना पाहून त्यांचे कुटूंब देखील त्यांना घाबरु लागले. कालीमातेची पूजा केल्यानंतर कालीमाता त्यांना प्रसन्न झाली व तिने काळूबाईला शरण जाण्यास सांगितले. काळूबाईला प्रसन्न करुन धावजी पाटलांनी काळूबाईला जिवंत समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली. सन १८६८ मध्ये धावजी पाटलांनी जिवंत समाधी घेतली. त्याकाळातील प्रथेप्रमाणे धावजी पाटलांची पत्नी सती गेली. धावजी पाटलांच्या समाधीस्थळावर येवून लोक डोकं टेकवू लागले. आपल्या इच्छा, आकांक्षा सांगू लागले. त्यासाठी मार्ग होता तो म्हणजे समाधीस्थळावर लिंबू मिरच्या ठेवणं, चिलीम देणं आणि कोंबडीच रक्त ओतनं. कालांतराने हा प्रकार वाढत गेला आणि धावजी पाटलांच मंदिर झालं. हे मंदिर पुढे काळ्याजादूसाठी, वषीकरणासाठी उल्लेखलं जावू लागलं.

भक्तांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी धावजीने समाधी जाताना आपला शिपाई चिडोबाला जवळची जागा दिली होती. चिडोबाच्या निधनानंतर तिथे चिडोबाच मंदिर उभा राहिलं. धावजी पाटलांच्या आशिर्वादाने भूतबाधा तर होतच नाही पण आपल्या किरकोळ समस्या देखील दूर होत असल्याचा लोकांचा समज होत गेला आणि आजूबाजूला कैकाडी बाबा, लमाण बाबा अशी मंदिरे वाढत गेली. सर्वच मंदिरांमधून दारू, मटण, चिलीम, अंडी यांचा नैवैद्य देण्यात येवू लागला.

हळुहळु या ठिकाणी कोंबडा आणि बकरे कापण्यास सुरवात झाली. धावजी पाटलांचा धावा केला की आपल्या मागे लागलेली भूतबाधा नाहीशी होते हा समज सर्वदूर पोहचला. शत्रू वशीकरण, विनाश कार्य अशा अडचणींसाठी लोक धावजी पाटलांना प्रसन्न करु लागले, आणि हि जागा काळ्या जादू आणि वशीकरणासाठी ओळखली जाऊ लागली.

काही वर्षांपुर्वी धावजी-पाटील मंदिरातील भोंदूबाबांवर एलसीबीने कारवाई करून पाच देवऋषींना अटक केली. सध्या याठिकाणी तुम्ही म्हणत आहात तसे काही घडत नाही. भक्तगण येतात हार, फुले, श्रीफळ अपर्ण करुन देवाला नमस्कार करतात असे येथील ग्रामस्थांनी ई-सकाळशी बाेलताना स्पष्ट केले. 

घरपट्टी माफीचा प्रस्ताव शासनाने फेटाळाल्यास असा हाेईल सातारकरांचा ताेटा 

या कथेतून आमचा हेतू अंधश्रद्धा पसरविण्याचा नाही. तुम्ही देखील काेणत्या ही स्वरुपाच्या अंधश्रद्धेला बळी पडू नका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com