दुष्काळी भागात बहरली स्ट्रॉबेरी ; पुसेगावच्या शेतकऱ्यांचा प्रयोग

पुसेगावच्या शेतकऱ्यांचा प्रयोग; आंतरपीक म्हणून लसणाचीही लागवड
Strawberry
Strawberrysakal

विसापूर/ खटाव : स्ट्रॉबेरीची शेती म्हटलं की आपल्या नजरेसमोर येते ते थंड हवचे ठिकाण. पण, आता हीच स्ट्रॉबेरी चक्क खटावच्या दुष्काळी पट्ट्यात बहरलेली पाहावयास मिळत आहे. पुसेगाव येथील प्रयोगशील शेतकरी राजेश देशमुख यांनी त्यांच्या खटाव हद्दीतील शेतात स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.

Strawberry
संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता महिला फाइटर पायलट होणार पर्मनंट

माण-खटाव तालुका म्हणजे कायमच दुष्काळाने ग्रासलेला. या पट्ट्यात शेती ही रामभरोसेच असते. कारण शेतकऱ्यांच्या पिकांवर निसर्ग अक्षरशः पाणीच फेरतो. एकतर पावसाचे प्रमाण अगदीच नगण्य, झालाच तर धो-धो बरसतो, तोही जेव्हा अपेक्षित असतो तेव्हा अवकृपा दाखवतो. अशा अनेक समस्या झेलताना शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच येते. पिकासाठी खर्ची घातलेला पैसा हाती येण्याची देखील शाश्वती नसते. अशा परिस्थितीत श्री. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन कोचरेकर आणि प्रशांत भोसले या त्यांच्या सहकाऱ्यांनी साक्षात खटावच्या दुष्काळी जमिनीवर स्ट्रॉबेरीचे पीक जोमात आणले असून, कमी दिवसांत जास्त पैसे कमविण्याची किमया साधली आहे.

Strawberry
कायद्याचा आदर करा नाहीतर दुकान बंद करा; न्यायालयाने ट्विटरला फटकारले

सुरुवातीला श्री. देशमुख यांच्यासमोर थंड हवेत पिकणारी स्ट्रॉबेरी उष्ण हवामानात कशी पिकवायची? हे मोठे आव्हान होते. यासाठी त्यांनी महाबळेश्वरमधील तज्‍ज्ञ शेतकऱ्यांना या ओसाड जमिनीवर आणले. या उष्ण तापमानात स्ट्रॉबेरीची शेती कशी करायची, याबाबत मार्गदर्शन घेतले. तीन वर्षे यावर अभ्यास करून ऑगस्टमध्ये ३० गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचे पीक घेतले. ऑक्टोबरमध्ये ही स्ट्रॉबेरी बहरली. आता एकदिवसाआड १५ ते २० हजारांप्रमाणे महिन्याकाठी अडीच ते तीन लाखांची उलाढाल सुरू आहे. पण, प्रयोग इथेच थांबला नाही, त्यांनी स्ट्रॉबेरीमध्ये आंतरपीक घ्यायला सुरुवात केली आहे. सध्या स्ट्रॉबेरी शेतीच्या काही क्षेत्रात लसणाची लागवड करण्यात आली आहे. तर उर्वरित क्षेत्रात दुसरं आंतरपीक घेण्याच्या ते तयारीत आहेत.

Strawberry
कायद्याचा आदर करा नाहीतर दुकान बंद करा; न्यायालयाने ट्विटरला फटकारले

किमान दहा बेरोजगारांना रोजगार

सध्या, हैदराबाद आणि गोव्याच्या बाजारात या स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे. त्यामुळेच रोज स्ट्रॉबेरीची तोड केली जाते. पॅकिंगही शेतातच केले जाते. त्यामुळे यासाठी किमान दहा बेरोजगारांना रोजगार मिळाला असून, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी इच्छा व्यक्त केल्यास त्यांच्या सोबतीने या दुष्काळी भागात स्ट्रॉबेरीची आणखी शेती पाहायला मिळेल, असा विश्वास श्री. देशमुख यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com