Satara Jail : कारागृहात बहरली स्ट्रॉबेरीची शेती; साताऱ्यात अधीक्षकांनी कैद्यांना दिले आधुनिक शेतीचे धडे

आतापर्यंत कारागृहामध्ये गोल्डन बेरी, तांबडा कोबी, ब्रोकोली अशा पिकांचे उत्पादन घेण्यात आले आहे.
Satara District Jail
Satara District Jailesakal
Summary

जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जिल्हा कारागृहात येणाऱ्या कैद्यांमध्येही शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.

सातारा : जिल्हा कारागृहाचे (Satara District Jail) अधीक्षक शामकांत शेडगे यांच्या संकल्पनेतून बंदिवानांना विविध प्रकारच्या आधुनिक पिकांच्या लागवडीचे तंत्र शिकवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कैद्यांसोबत (Prisoner) लावण्यात आलेल्या स्ट्रॉबेरीच्या (Strawberries) रोपांना आता फळे लगडली आहेत. या संकल्पनेमुळे सुधारणा व पुनर्वसन हे कारागृह विभागाचे ब्रीद वाक्य प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.

गोल्डन बेरी आणि ब्रोकाली

कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी ही आधुनिक शेतीची (Modern Agriculture) संकल्पना कारागृहात राबविण्यास सुरुवात केली. त्यामध्ये पारंपरिक पिकांऐवजी सध्या बाजारात चालणाऱ्या व चांगला दर मिळणाऱ्या पिकांची त्यांनी निवड केली. त्यातून आतापर्यंत कारागृहामध्ये गोल्डन बेरी, तांबडा कोबी, ब्रोकोली अशा पिकांचे उत्पादन घेण्यात आले आहे.

Satara District Jail
..अखेर ऊसदराचा तोडगा निघाला! पहिली उचल 3175 रुपये एकरकमी देण्याचा निर्णय; राजू शेट्टींच्या आंदोलनाला मोठं यश

व्हिटर नाबिया स्ट्रॉबेरीची लागवड

विविध पिके घेतल्यानंतर शेडगे यांनी कारागृहात स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पाचगणी, महाबळेश्वर व भोर या भागांत प्रत्यक्ष जाऊन अभ्यास केला. स्ट्रॉबेरीच्या जाती, लागवड व जोपासणीची पद्धत यांची माहिती घेतल्यावर कारागृहामध्ये लावण्यासाठी व्हिटर नाबिया या जातीची निवड करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी या जातीच्या ३५० रोपांची लागवड करण्यात आली. योग्य पद्धतीने जोपासणी केल्यामुळे सध्या या रोपांना चांगली स्ट्रॉबेरी लागली आहे.

अधिकाऱ्यांचे सहकार्य

शेतीची संकल्पना मांडल्यानंतर शेडगे यांना एडीजी अमिताभ गुप्ता, आयजी जालिंदर सुपेकर, डीआयजी स्वाती साठे यांनी मार्गदर्शन व मदत केली. त्याचबरोबर शेती विभागाची जबाबदारी वरिष्ठ जेलर राजेंद्र भापकर, सुरक्षेचे काम पाहणारे ज्ञानेश्वर दुबे यांसह सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष अंमलबजावणीत मोलाची साथ दिली. त्यांनी कैद्यांना प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करत कामे करून घेतली.

Satara District Jail
Satara : साखर उताऱ्यात पालकमंत्र्यांचा कारखाना आघाडीवर; 15 कारखान्यांत 30 लाख 70 हजार क्विंटल साखरेची निर्मिती

बहुतांश कैदी शेतकरी

जिल्ह्यामध्ये बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती हाच आहे. जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जिल्हा कारागृहात येणाऱ्या कैद्यांमध्येही शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या कैद्यांना आधुनिक व चांगले उत्पन्न देणाऱ्या शेती पिकांची व त्यांना जोपासण्याच्या पद्धतीची माहिती मिळाल्यास भविष्यात ते आपले कुटुंब चांगल्याप्रकारे सांभाळू शकतात. याच हेतूने चांगला दर देणाऱ्या पिकांची लागवड करण्याचा प्रयोग जिल्हा कारागृहात सुरू करण्यात आला आहे.

Satara District Jail
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरच्या अतिक्रमणांवर दोन दिवसांत हातोडा पडणार; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

जिल्हा हा शेती प्रधान आहे. बहुतांश बंदी जणांचा मूळ व्यवसाय हा शेतीच असल्याचे समोर येते. त्यामुळे त्यांना शेतीसंदर्भातील आधुनिक ज्ञान देण्याचा निर्णय घेतला. त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे, यासाठी प्रत्येक टप्प्यावर तज्ज्ञ मार्गदर्शन, पाणी, खत कीटकनाशक याबाबतची सर्व माहिती दिली जाते. त्यामुळे सुटून गेल्यानंतर आपल्याला शेतात हे नवीन प्रयोग राबविणे त्याला शक्य होणार आहे.

-शामकांत शेडगे, कारागृह अधीक्षक (जिल्हा कारागृह, सातारा)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com